Quarantine the people in Rajur | Sarkarnama

पाहुण्याचे अंत्यदर्शन पडले भारी, राजूरकरांना आता घरात बसण्याची बारी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 मे 2020

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका अंत्ययात्रेला राजूरचे सहा लोक गेले होते. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने अंत्यदर्शनासाठी आलेल्या सर्व लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे.

अकोले : धांदरफळ (ता. संगमनेर) येथे अंत्ययात्रेस गेलेल्या सहा नागरिकांमुळे संपूर्ण राजूर गावाला घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे. गाव कडकडीत बंद केल्याने शुकशुकाट झाला, तर तपासणीसाठी पाठविलेल्या लोकांचे अहवाल येईपर्यंत गावकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका अंत्ययात्रेला राजूरचे सहा लोक गेले होते. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने अंत्यदर्शनासाठी आलेल्या सर्व लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. राजूर येथील सहा व्यक्ती तेथे गेल्या होत्या. त्यांना आता तपासून रुग्णवाहिकेतून नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळपासून राजूर कडकडीत बंद होते, तर पोलीस, महसूल, राजूर ग्रामपंचायतीने घरातच राहण्याचे अवाहन केल्याने राजूरमध्ये आज शुकशुकाट होता.
राजूर येथील काही लोक कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेस गेल्याचे समजताच राजूर ग्रामपंचायतीने तहसीलदारांना कळविले. त्यामुळे संबंधितांना तपासणी करून होम क्वारंटाईनची विनंती केले होती. खबरदारी म्हणून शनिवार ते सोमवार या तीन दिवस राजूर गाव बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती सरपंच गणपत देशमुख यांनी दिली. 
याबरोबरच गावातील ज्या व्यक्ती धांदरफळ येथे गेले होते, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली माहिती द्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही सरपंच देशमुख केले, त्यास आज राजूरकरांनी प्रतिसाद दिला. स्थानिक कमेटीच्या आवाहनानुासर लोकांनी तोंडाला मास्क लावणे सक्तीचे केले असून, बाहेर फिरणारावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 

ते 23 मजूर पळून चालले होते
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला न मानता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सिमेंटच्या ट्रकमधून परप्रांतीय पळून जाणारे 23 मजूर व ट्रक अकोले पोलिसांनी काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. त्या 23 मजुरांना पुन्हा मवेशी येथे पाठविण्यात आल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी दिली.मवेशी येथेएकलव्य आश्रम शाळेचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार येथून मजूर कामासाठी आले होते. मात्र लॉकडाऊन व ठेकेदाराकडून वेळेवर मजुरी मिळत नसल्याने हे मजूर अस्वस्थ होते. आठ मे रोजी चांदवड येथील ट्रक सिमेंट घेऊन आला असता त्या मजुरांनी ट्रक चालक शंकर सदाशिव पवार यास पटवून पळून जाण्याचे नियोजन केले. रात्री अकरा वाजता 23 मजूर महिला मुलासह बसून जात असताना अकोले येथील महात्मा फुले चौकात पोलिसांनी पकडले. याबाबत ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करून सर्व मजुरांना पुन्हा मवेशी येथे पाठविण्यात आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख