पिचडांना धक्का ! सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Push the pitchers! Sitaram Gaikar will join NCP tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

पिचडांना धक्का ! सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुरलीधर कराळे
सोमवार, 15 मार्च 2021

बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर गायकर यांनी अखेर राष्ट्रवादीत जेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या हा पक्ष प्रवेश ठरल्याचे सूत्रांकडून समजले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्याची तयारीही सुरू केली आहे.

नगर ः जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड तसेच माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे समर्थक सीताराम गायकर उद्या (ता. 16) मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अकोल्यात पिचड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गायकर यांना बिनविरोध होण्यासाठी अजित पवार यांनी सहकार्य केले. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माघार घेण्यास सांगून गायकर यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे त्याच वेळी गायकर राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार, हे स्पष्ट झाले होते.

हेही वाचा.. आमचं मस्त चाललंय

बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर गायकर यांनी अखेर राष्ट्रवादीत जेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या हा पक्ष प्रवेश ठरल्याचे सूत्रांकडून समजले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्याची तयारीही सुरू केली आहे.

 

हेही वाचा..    
थोरात कारखान्याचा नवीन इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित

संगमनेर : दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारू निर्मिती न करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय घेतला. ही परंपरा व आदर्श तत्वे साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाने जपत देशात लौकीक प्राप्त केला आहे. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शक कारभार या त्रिसूत्रीवर थोरात कारखान्याची वाटचाल गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

हेही वाचा... प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले

कारखान्याच्या 40 हजार लिटर क्षमतेचा नवीन इथेनॉल प्रकल्प, सीपीयु युनिट व लिप्टच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की कारखान्याने नव्याने हाती घेतलेला पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेसह 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प सर्वांसाठी दिशादर्शक ठरला. याबरोबरच डिस्टलरी प्रकल्पाचे नुतनीकरण करताना चाळीस हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ होणे अत्यंत अभिमानास्पद आहे. वीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला मदत होणार आहे.

दिवंगत दादांनी मळीपासून दारु न बनविता औद्योगिक वापराचे अल्कोहोल बनविण्याचा दुरदृष्टीने निर्णय घेतला. कारखान्याने ऊस उत्पादक व सभासदांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून, कठिण परिस्थितीत तालुक्याच्या विकासात योगदान देत सुरू असलेली कारखान्याची वाटचाल गौरवास्पद आहे, असे ही ते म्हणाले.

डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, की संगमनेर हे सहकाराचे मॉडेल आहे. येथे चांगल्या तत्त्वांची जपवणूक केली असून, सहकार, शिक्षण, समाजकारण, सांस्कृतिक चळवळी, सुरक्षितता या सर्व क्षेत्रातील प्रगतीमुळे लौकिक निर्माण झाला आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख