नगर जिल्ह्यासाठी 500 वाढीव पोलिसांचा प्रस्ताव - Proposal for 500 additional police for Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यासाठी 500 वाढीव पोलिसांचा प्रस्ताव

गाैरव साळुंके
मंगळवार, 9 मार्च 2021

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार नगर जिल्ह्यासाठी पुढील काळात वाढीव पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी 500 पोलीस वाढीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविला आहे.

श्रीरामपूर : नगर जिल्हा भौगोलिक दृष्या मोठा असून येथील राजकीय परिस्थिती संवेदनशिल आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार नगर जिल्ह्यासाठी पुढील काळात वाढीव पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी 500 पोलीस वाढीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डाॅ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील अतिरिक्त ताण काही अंशी कमी होणार आहे.

पोलीस प्रशासनातील मॅनपाॅवर वाढली, तर पोलीसींग करताना सुसुत्रता येईल. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्हे तातडीने मार्गी लागणार असल्याचा विश्वास विशेष पोलीस महानिरिक्षक डाॅ. दिघावकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...  गृहखात्याचे ते अपयश

डाॅ. दिघावकर हे आज श्रीरामपूर- बेलापूर दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील होते.

डाॅ. दिघावकर म्हणाले, की नगर जिल्हा भौगोलिक दृष्या मोठा असून, येथील राजकीय परिस्थिती संवेदनशिल आहेत. त्यामुळे वाढीव पोलीस मनुष्यबळासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी आपल्याला पोलीस बल वाढीची मागणी केली आहेत. त्यानुसार 500 वाढीव पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

पोलिसांची मॅनपाॅवर वाढल्यास पोलीसिंग करण्यासाठी सुसुत्रता येणार आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्हे मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूरात स्वतंत्र पोलीस कंट्रोल रुमची आवश्यकता असून येथे पोलीस उपमुख्यालय (सबहेडकाॅटर) करता येईल. मात्र त्यासाठी 50 एकर जागा लागणार आहे. जागेचा प्रश्न सुटल्यास येथे पोलीस परेड, सराव, दारुगोळा, आरसीबी पोलीस बल, राखीव पोलीस बल तैनात करता येईल.

हेही वाचा.... प्रताप दिघाकर लक्ष घालणार

पोलिसांची प्रत्येकांची काम करण्याची शैली वेगवेगळी असते. पोलीस खात्यात खमक्या अथवा अखमक्या पोलीस अशी व्याख्या नसते. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही चांगली पोलीसिंग करण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असल्याचे डाॅ. दिघावकर यांनी सांगितले.

सुक्षिशित बेरोजगार तरुणांना नोकरीचे अमिष दाखवुन शेकडो तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 38 टोळ्यांना पोलीसांनी गजाआड केले आहे. पोलीसांनी आरोपींकडुन पावनेदोन कोटी रुपये वसूल केली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांना सदर रक्कम परत केली. तसेच पोलीस खात्यातील अनुकंपावरील जागा भरतीचा प्रश्न सोडविला जाणार आहे. तसेच अंतर जिल्हा बदलीवर पोलीस प्रशासन लवकरच घेणार आहे. पोलीस प्रशासन येत्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे डाॅ. दिघावकर यांनी स्पष्ट केले.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख