घोषणाबाज सरकारची फ्युज उडाली : विखे पाटील

वीज वितरण कंपनीच्‍यावतीने ग्राहकांना देण्‍यात आलेल्‍या सरसकट बिलांची होळी आणि सरकारच्‍या फसव्‍या धोरणांचा निषेध करण्‍यासाठी आमदारविखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्‍यात आले.
radhakrushna vikhe 2.jpg
radhakrushna vikhe 2.jpg

नगर : ``ग्राहकांना जादा बिले देऊन सरकारने काय साधले. सरसकट वीज बील पाठवून ग्राहकांना शॉक दिला आहे. बिघाडी सरकारच्‍या फसव्‍या धोरणाचीच होळी रस्‍त्‍यावर उतरुन करण्‍याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारची फ्युजही आता उडाली आहे,`` अशी टीका भाजपाचे जेष्‍ठ नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

लोणी खुर्द येथेही वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्‍यात आला. याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, बापूसाहेब आहेर, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राम्‍हणे आदी उपस्थित होते. राहाता तालुक्‍यातील विविध गावांमध्‍येही भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात आक्रोश व्‍यक्‍त केला आहे.

वीज वितरण कंपनीच्‍यावतीने ग्राहकांना देण्‍यात आलेल्‍या सरसकट बिलांची होळी आणि सरकारच्‍या फसव्‍या धोरणांचा निषेध करण्‍यासाठी आमदार विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्‍यात आले. वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपा कार्यकर्त्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सरकारच्‍या धोरणावर टीका करताना आमदार विखे पाटील म्‍हणाले, की लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये सामान्‍य माणसाला वीज वितरण कंपनीने सरसकट बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड टाकला आहे. या सरसकट वीज बिलांची वसुली वितरण कंपनींने तातडीने थांबवावी. १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्‍याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्‍हती. परंतु संवग लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडीकडून केवळ घोषणा आणि आश्‍वासने दिली जात आहेत. उर्जा मंत्र्यांनीच स्‍वत:च्‍या घोषणेपासून पळ काढला आहे. या घोषणेची पुर्तता करुन तातडीने १०० युनिटपर्यंत वीजबील माफ करण्‍याचा आग्रह सरकारकडे आम्‍ही धरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.विखे पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्‍त घोषणाबाजी सुरू आहे. सरकारच्‍या कोणत्‍याही धोरणात आणि निर्णयात स्‍पष्‍टता नाही. केवळ निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांपासुन जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम मंत्र्यांकडुन केले जाते. वीज बिल माफीची नागरीकांची मागणी दुर्लक्षीत व्‍हावी म्‍हणून अचानक या सराकरने घाईत उर्जा धोरण जाहीर केले. तुमच्‍या तिजोरीत जर पैसाच नाही, तर मग घोषणा करता कशाला? अशा प्रश्‍न उपस्थित करुन आमदार विखे पाटील म्‍हणाले की, काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे, हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्‍याचा प्रयत्‍न आहे. राज्‍यातील जनतेशी केलेल्‍या विश्‍वास घातामुळे या सरकारची फ्यूजच उडाली असल्‍याची खरमरीत टीका विखे पाटील यांनी केली आहे.

शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता नाही

शाळा सुरु करण्‍याबाबतही सरकारमधील मंत्र्यांची कोणतीही एकवाक्‍यता नाही. शिक्षण मंत्र्यांच्‍या निर्णयालाच राज्‍यमंत्री विरोध करतात. महाराष्ट्रात शिक्षकांच्‍या कोवीड तपासणीसाठी कोणतीही सुसज्‍ज यंत्रणा नाही. सरकार पुर्णत: गोंधळलेल्‍या परिस्थितीत असून, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्‍यामध्‍ये झालेली संभ्रमावस्‍था दुर करण्‍यात सरकारला पुर्ण अपयश आले असल्‍याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com