पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नगरकरांशी संवाद साधणार - Prime Minister Modi will interact with Nagarkars shortly | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नगरकरांशी संवाद साधणार

रविंद्र काकडे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

आज सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकता नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागली आहे. यामुळे प्रवरा परिसरातील वातावरण अतिशय चैतन्यमय झाले आहे.

लोणी : सहकार क्षेत्रात व नगर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले दिवंगत माजी माजी खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र असलेल्या `देह वेचावा कारणी` या पुस्तकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे होणार आहे. या निमित्ताने ते नगरकरांशी संवाद साधणार आहेत.

लोणी येथे होत असलेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आदी उपस्थित आहेत. 

थोड्याच वेळात (सकाळी 11 वाजता) सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकता नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागली आहे. यामुळे प्रवरा परिसरातील वातावरण अतिशय चैतन्यमय झाले आहे. खेड्यापाड्यातील प्रत्येकाला हा सोहळा पाहाता यावा, यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरपेक्षा जास्त सेंटर तयार करण्यात आले आहेत. धंजयराव गाडगीळ सभागृहात कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. प्रमुख पाहुणे व मान्यवर प्रमुख कार्यक्रमस्थळी म्हणजे प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये अनेक व्हर्च्युअल सेंटर्स तयार केले असून कोरोना नियमावलिचे पालन करून नियोजन करण्या आले आहे.

प्रवरा ग्रमीण शिक्षण संस्थेचे नामकरण या प्रसंगी होणार आहे. त्याचीही तयारी पूर्ण झाली आहे.

कृषी कायद्याबाबत भूमिका मांडणार

पंतप्रधान मोदी नागरिकांशी संवाद साधताना नव्याने केलेल्या कृषी कायद्याबाबत आपली भूमिका विषद करणार आहेत. ते कशा पद्धतीने त्याचे विश्लेषण करणार, याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख