पंतप्रधान मोदी यांनी सांगितला बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूलमंत्र - Prime Minister Modi said the basic mantra of the life of Balasaheb Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितला बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूलमंत्र

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आदर्श घेऊन चालणाऱ्या दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतः लोकांसाठी आपले जीवन अर्पण केले. हाच विखे पाटील यांच्या जीवनाचा हा मुलमंत्र राहिला.

नगर : ``डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आदर्श घेऊन चालणाऱ्या दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतः लोकांसाठी आपले जीवन अर्पण केले. हाच विखे पाटील यांच्या जीवनाचा हा मुलमंत्र राहिला,`` अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गाैरव केला.

विखे पाटील यांच्या आत्मचरित्र असलेल्या `देह वेचावा कारणी` या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्यूअल व्हिडिओ काॅन्फरन्सीने उपस्थित होते. लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्तविक केले.

बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गाैरव करताना मोदी म्हणाले, की आपले आत्मचरित्र त्यांनी लिहिले. त्यांनी त्या पुस्तकात म्हटले आहे, की `मी स्वतः सत्तेपासून किंवा राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही. मात्र समाजासाठीच राजकारण व सत्ता हे पथ्य ही कायम सांभाळले. राजकारण करताना माझ्या समाजाचे प्रश्न सोडविले. बाळासाहेब विखे पाटील यांनी समाजाच्या विकासासाठीच प्रयत्न केला. त्यांचा विचार समाजविकासाला महत्त्वाचा ठरला. त्यांचा आजही सर्वच पक्षांत मोठा सन्मान आहे. गरीबांच्या शिक्षेसाठी त्यांचा प्रयत्न राहिला. आगामी पिढीला हे प्रेरणा देणारे ठरले. त्यांच्या जीवनावरील पुस्तक आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. युवा पिढीला प्रेरणा देणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.

खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख