मागील सरकारचा खूप त्रास सहन करावा लागला : डाॅ. तात्याराव लहाने यांची खंत - The previous government had to suffer a lot: Dr. Tatyarao Lahane's grief | Politics Marathi News - Sarkarnama

मागील सरकारचा खूप त्रास सहन करावा लागला : डाॅ. तात्याराव लहाने यांची खंत

विनायक दरंदले
रविवार, 31 जानेवारी 2021

मागील फडणवीस सरकारचा खूप त्रास सहन करावा लागला. पद्मश्री 
मिळाल्यानंतरही खूप सहन करावं लागलं, अशी खंत डाॅ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.

सोनई : मागील फडणवीस सरकारचा खूप त्रास सहन करावा लागला. पद्मश्री 
मिळाल्यानंतरही खूप सहन करावं लागलं, अशी खंत डाॅ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.

वंजारवाडी (ता. नेवासे) येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या पुरस्कारानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णू केंद्रे महाराज होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार तुकाराम गडाख, युवानेते उदयन गडाख, भगवान महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष जावळे उपस्थित होते. 

आघाडी सरकार आल्यानंतर मंत्री मुंडे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत माझी बाजू मांडत मला शासनस्तरात काम करण्याची संधी दिली. प्रेम कसं करावं व आपल्या माणसांना कसं जपावं, हे धनंजय मुंडे यांच्या कडून शिकण्यासारखं आहे. असे सांगुन 
डाॅ. लहाने यांनी डोळ्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक माहिती देत सप्ताह सोहळ्यातून आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले. 

मंत्री मुंडे म्हणाले, की "डाॅ. लहाने या उतुंग व्यक्तीमत्वाचा सन्मान माझ्या सारख्या लहान माणसाच्या हातून झाला, हे माझे खुप मोठे भाग्य आहे." पुरोगामी महाराष्ट्रात कुठल्याही वाडी व गावाला कुठल्याही  जातीचे नाव असणे परवाडणारे नाही. संत ,महंत व राष्ट्रपुरुषांचे नाव द्या, मात्र जातीचे नको, असे ते म्हणाले. मंत्री  माजी खासदार गडाख, युवा नेते उदयन गडाख यांचे भाषण झाले.

 

हेही वाचा...

भाषा आणि साहित्यामुळे मानवी जीवन समृध्द होते

संगमनेर : भाषेशिवाय मानवी जीवन अर्थहीन असून, भाषा आणि साहित्य मानवी जीवनाला समृध्द करते. आज भाषेमुळे जगात जी भौतिक व अध्यात्मीक समृध्दी झाली. भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यिक शंकर बोऱ्हाडे यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाचा ऑनलाईन समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. 

ते म्हणाले, की मराठी भाषक व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतो. मराठी भाषा आणि साहित्य याचा अनुबंध परंपरेचा विचार करताना, दहाव्या शतकापर्यंत जावे लागते. जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा महत्वाची असल्याचे जगातील भाषा वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर यांनी मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त राबवलेल्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख