आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेडला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण - Pre-recruitment training for Jamkhed through the efforts of MLA Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेडला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

वसंत सानप
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन 'पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण' घेण्यात येणार आहे.

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन 'पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण' घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून राज्य पोलीस दलात १२ हजार ५३८ जागांची भरती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. संबंधित अधिकारी वर्गाला त्याबाबत सुचनाही दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड तालुक्यातील युवक-युवतींना ही मोफत संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात लेखी परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणी, अशी तयारी करून घेण्यात येणार आहे.

लॉकडाउनच्या काळात लेखी परीक्षेतील मराठी, अंक गणित, बुद्धिमत्ता चाचणी तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील तज्ज्ञ मंडळी हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित युवक-युवतींनी आपली नोंदणी करणे अनिवार्य असून, https://bit.ly/2fuz2P G या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या QR CODE वरूनही नोंदणी करता येणार आहे.

मतदारसंघातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी आमदार पवार यांच्या आई सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, सायाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून तालुक्यात त्यांनी कुसडगाव येथे राज्य राखीव दलाचे पोलिस प्रशिक्षण केंद्र खेचून आणले आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख