प्रसाद तनपुरे यांचे गडकरी यांना या कारणासाठी साकडे - Prasad Tanpure to Gadkari for this reason | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

प्रसाद तनपुरे यांचे गडकरी यांना या कारणासाठी साकडे

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कर्नाटक, आंध्रप्रदेशातून येणाऱ्या हजारो ट्रक रोज या रस्त्यावरून उत्तर भारतात जातात. हा रस्ता चाैपदरीकरण व्हावा, सिमेंट काॅंक्रेटचा व्हावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे.

नगर : नगर - मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, रस्त्याची झालेली चाळण पाहून माजी खासदार प्रसाद तनपुरे व्यथित झाले. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना रस्ता दुरुस्तीबाबत साकडे घातले.

नगर-मनमाड हा राज्यमार्ग क्र. 49 हा केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 म्हणून घोषित केला. नगरहून शिर्डीकडे जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे जागतिक पर्यटनस्थळामुळे रस्त्यावर कायम वर्दळ असते. शिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेशातून येणाऱ्या हजारो ट्रक रोज या रस्त्यावरून उत्तर भारतात जातात. हा रस्ता चाैपदरीकरण व्हावा, सिमेंट काॅंक्रेटचा व्हावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. तथापि, त्याकडे केंद्राचे दुर्लक्ष झाले.

आज तनपुरे यांनी या रस्त्याच्या समस्येबाबत लक्ष वेधले. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा एकमेव जवळचा मार्ग आहे. राज्य सरकारने 2000 साली रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात त्याची केवळ डागडुजी झाली. हजारो वाहने धावत असल्याने रस्त्याची लगेचच चाळणी होते. परिणामी टायर फुटणे, अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

या रस्त्यावर अपघातांची मालिका

दरम्यान, या महामार्गावर दरवर्षी अनेक अपघात होतात. विशेषतः नगरची औद्योगिक वसाहत ते राहुरी दरम्यानचा रस्ता कायम खड्डेमय असतो. देहरे गावादरम्यान काही भागात दरवर्षी खड्डेच खड्डे असतात. रेल्वे पुलाच्या जवळील रस्ता कायम उखडलेला असतो. तेथे अपघातांची मालिकाच सुरू असते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त व्हावा, अशी कायम मागणी होत असते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख