दर्जेदार काम नसल्याने प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम ! - Prajakta Tanpure breaks a sweat for lack of quality work | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

दर्जेदार काम नसल्याने प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम !

विलास कुलकर्णी
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

माझ्या मतदार संघात रस्त्याच्या कामाच्या बाबतीत कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या कररुपी पैशाचा विनियोग अत्यंत योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. यावर माझे बारीक लक्ष असणार आहे.

राहुरी :डोंगरगण ते बांबोरी रस्त्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. निविदेत नमूद केल्याप्रमाणे काम होत नसल्याचे लक्षात आले. तसा रागाचा पारा चढला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ संपर्क साधून, रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.

राज्यमंत्री तनपुरे डोंगरगण- वांबोरी रस्त्यावरून विवाह सोहळ्यासाठी चालले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच नितीन बाफना किसन जवरे बरोबर होते. रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तात्काळ ताफा थांबवण्यास सांगितले. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला.  

कामावर उपस्थित सुपरवायझरला बोलावून त्यांनी "माझ्या मतदार संघात रस्त्याच्या कामाच्या बाबतीत कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या कररुपी पैशाचा विनियोग अत्यंत योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. यावर माझे बारीक लक्ष असणार आहे," असा दम भरला. तत्काळ अधीक्षक अभियंत्यांना संपर्क साधून, संबंधित अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.  त्यामुळे, उपस्थितांचे धाबे दणाणले.

असे प्रकार खपवून घेणार नाही

सध्या करोनामुळे रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळणे मोठे अवघड झाले आहे. अशात जी कामे चालू आहेत. ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार होणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने तसे होताना बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. महाराष्ट्रात अशा पद्धतीने कामे सुरू असतील, तर त्यांवरही निर्बंध लादले पाहिजे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे मत प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख