मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुकपेज हॅक - Prajakt Tanpure's Facebook page hacked | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुकपेज हॅक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुकपेज हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी तसे कळविले आहे. या पेजवरून कोणतीही पोस्ट आली, तर ती ग्राह्य धरू नये, असे तनपुरे यांनी म्हटले आहे.

नगर : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुकपेज हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी तसे कळविले आहे. या पेजवरून कोणतीही पोस्ट आली, तर ती ग्राह्य धरू नये, असे तनपुरे यांनी म्हटले आहे.

तनपुरे यांचे सोशल मीडियावरून अनेकदा लोकांसाठी संदेश दिले जातात. त्यामाध्यमातून लोकांपर्यंत तनपुरे यांचे उपक्रम पाठविले जातात. आता फेसबुक पेज हॅक झाल्यामुळे कार्यकर्त्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

मंत्र्यांचे सोशल मीडियाचे पेज हॅक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वीही भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे बनावट ट्विटर अकाउंट बनविण्यात आले होते. त्यांनीही पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. 

दरम्यान, सायबर क्राईमने ब्रॅंचकडून याचा तपास होऊन गुन्हेगार पकडला जाऊ शकेल, परंतु मंत्र्यांचे अकाउंट हॅक होत असेल, तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात असे प्रकार घडू लागल्याने राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख