दिवाळीनंतर राजकीय फटाके ! पारनेरमध्ये लंके की औटी यांचे राॅकेट उ़डणार - Political firecrackers after Diwali! Lanka Ki Auti's rocket will fly in Parner | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

दिवाळीनंतर राजकीय फटाके ! पारनेरमध्ये लंके की औटी यांचे राॅकेट उ़डणार

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची अघाडी असली तरीही पारनेर नगरपंचायतीत अघाडी होणार नाही, हे जवळजवळ निश्चितच आहे. त्यामुळे  नगर पंचयातीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रावादी काँग्रेस एकमेकांसमोर ठाकणार आहेत.

पारनेर : पारनेर नगरपंचायत निवडणुकीचे फटाके ऐन दिवाळीतच फूटू लागले आहेत. विविध प्रश्नांची सरबत्ती करीत ते सोडविण्यासाठी आपणच कसे सक्षम आहोत, हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यात धुमशान सुरू झाले आहे. दिवाळीनंतर फुटत असलेल्या या राजकीय फटाक्यात आता कोणाचे राॅकेट उडणार, हे लवकरच दिसणार आहे.

आमदार निलेश लंके यांनी पारनेरचा पाणीप्रश्न मीच सोडवू शकतो, असे सांगून नगरपंचायतीत 17 विरुद्ध 0 करणार, असे जाहीर वक्तव्ये केले आहे. तर माजी आमदार विजय औटी यांनी प्रथमच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाहेरून येऊन कोणी काहीही अश्वासन देईल. मात्र मतदार जागृत आहेत. पारनेरच्या अस्मितेसाठी मतदारांना कोणाचे 17- 0 करावायाच, हे चांगले समजते. आपण सर्वांनी एकदिलाने कामाला लागा सत्ता आपलीच आहे, असे सांगितले आहे.

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची अघाडी असली तरीही पारनेर नगरपंचायतीत अघाडी होणार नाही, हे जवळजवळ निश्चितच आहे. त्यामुळे  नगर पंचयातीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रावादी काँग्रेस एकमेकांसमोर ठाकणार आहेत. मध्यंतरी शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले होते. त्यांनी थेट बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यावरून राज्यात आघाडीत मोठा गदारोळ झाला व हे प्रकरण थेट राज्यातही खूप गाजले.

शेवटी अघाडीत एकत्र काम करावयाचे असेल, तर एकमेकांचे कार्यकर्ते फोडून चालणार नाही, असे सांगत राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये गेलेल्या या पाच नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले व त्यांची घरवापसी केली, मात्र त्यांचे स्थानिक पक्षनेतृत्वाशी जमत नसल्याने ते मनाने शिवसेनेत आलेच नाहीत. ते आमदार लंके यांच्या सोबतच राहिले. 

आताही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, याची सुताराम शक्यता नाही. दोन्ही पक्ष नेतृत्वांचे व कार्यकर्त्यांची मने जुळणे कठीण आहे. त्यामुळे ते नगरपंचायत एकमेकांच्या विरोधातच लढणार हे निश्चित आहे.

आमदार लंके यांनी पारनेर शहरासाठी ज्यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता होती, त्यांना साधा पारनेरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, हे सांगत मीच पारनेरसाठी कायमस्वरूपी पाणी आणल्याशिवाय राहाणार नाही, तसेच पारनेरचा चेहरा मोहरा मीच बदलू शकतो, असे जाहीर सांगत 17 - 0 ची भाषा सुरू केली आहे, तर माजी आमदार औटी यांनी पारनेर शहराचा किती व कसा विकास केला हे पारनेरकरांना माहित आहे. पुर्वीचे व आताचे पारनेर यातील फरकत जनतेला ज्ञात आहे.

मतदार सुज्ञ आहेत. मी काय केले, हे मतदारांना चांगले माहि आहे. तालुक्याच्या नेतृत्वाने शहराला किती निधी दिला, हे मतदारांना माहित आहे, असे सांगून शहराच्या अस्मितेसाठी मतदार स्थानिक नेतृत्वाबरोबर राहून 17- 0 केल्याशिवाय राहाणार नाही, असे कार्यकर्त्यांच्या बैठकित सांगितले आहे. त्यामुळे आता शहरावर सत्ता कोणाची येणार, याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू झाली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख