जामखेडमधील त्या पोलिसांचा तहसीलदारांनी गाैरव केला कारण...

दहिफळे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा पोलिसखात्याची आणि त्यांची उंची वाढविणारा ठरला. या प्रामाणिक पोलिस कर्मचाऱ्यांचा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गौरव केला.
police dahiphale.png
police dahiphale.png

जामखेड : येथील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव दहिफळे हे येथील लक्ष्मी चौकातील चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असताना त्यांना एका व्यक्तीचा एक लाख 20 हजार रुपयांचा बेअरर असलेला धनादेश सापडला. दहिफळे यांनी त्या व्यक्तीचा सोशल मीडियाचा आधार घेऊन शोध घेतला. आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यामार्फत तो धनादेश त्या व्यक्तीला सुपूर्द केला.

दहिफळे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा पोलिस खात्याची आणि त्यांची उंची वाढविणारा ठरला. या प्रामाणिक पोलिस कर्मचाऱ्यांचा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गौरव केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची परवा न करता पोलिसांनी राज्याच्या विविध भागात दिवस-रात्र चेक पोष्टवर कर्तव्य बजावत आहेत. जामखेड ही त्याला अपवाद नाही. येथील लक्ष्मी चौकात उभारलेल्या पोलिस चौकीत दिवस-रात्र पोलिस व अन्य कर्मचारी कर्तव्यावर असतात. यापैकी पोलीस काॅन्स्टेबल ज्ञानदेव दहिफळे हे  मंगळवारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना एक लाख वीस हजार रुपयाचा स्वाक्षरी केलेला धनादेश सापडला. तो बेअरर होता. त्यामुळे संबंधित रक्कम लगेच बॅंकेतून कोणालाही बनावट नाव सांगून काढता आली असती. 

दहिफळे यांनी याबाबतची माहिती आपल्या सहकाऱ्यांना कळविली. धनादेश हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्यांना बुधवारी तहसील कार्यालयात बोलावले. दहिफळे ही तहसील कार्यालयात पोहचले. त्यांनी सापडलेल्या धनादेशा संदर्भातील संपूर्ण तपशील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितला आणि सापडलेला धनादेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते व शहरातील प्रमुख व्यक्ती उपस्थितीत होते.

या वेळी  तहसीलदार नाईकवाडे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि यासंदर्भातील सत्यता यापासून पाहिली. खातेदाराची ओळख पटली आणि तो धनादेश संबंधित खातेदारास सूपूर्त केला. हरवलेला धनादेश सापडल्याने खातेदारही सुखावला. यानिमित्ताने दहिफळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणाचे तहसीलदार नाईकवाडे यांनी कौतुक केले. तसेच दहिफळे यांचा गौरव केला.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com