पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, शिवसेनेने आणली बैलगाडी !

केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे.प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहेत.
shivsena.png
shivsena.png

नगर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडी आणून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच शेतकऱ्यांचा अपमान करणारे भाजपनेत्यांचा निषेध करण्यात आला.

बसस्थानक जवऴील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आले. तसेच या वेळी शेतकर्‍यांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला.

या प्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापाैर अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले उपस्थित होते.

सातपुते म्हणाले, की केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जनता आर्थिक संकटात सापडली असून, त्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहे. यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल.

दानवेच खरे शेतकऱ्यांचे शत्रू

विक्रम राठोड म्हणाले, की शेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेत. अन्नदात्त्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचाही अनादर केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांचा सर्वसामान्यांला मोठा फटका बसत असून, सर्वत्र दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. याचा निषेध करुन दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com