People's Representatives will not tolerate the language of action against Sarpanch from the authorities: Pitched | Sarkarnama

लोकप्रतिनीधी, अधिकाऱ्यांकडून सरपंचांविषयी कारवाईची भाषा खपवून घेणार नाही : पिचड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 जून 2020

आपणास अनेक सरपंचांचे फोन आले असून, काही सरपंचांना मारहाण, तर काहींवर पदे घालविण्याची दमबाजी सुरु आहे. राजकीय आकसापोटी कारवाई होत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही.

अकोले : राज्य, जिल्हा, तालुका व गावागावातील सरपंच कोरोना प्रतिबंधासाठी जीवाचे रान करून सरकारचे कोणतेही संरक्षण नसताना कोरोना योध्ये म्हणून काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय आकसापोटी लोकप्रतिनिधी व अधिकारी कारवाईची भाषा करत असतील, तर त्या सरपंचांनी काम कसे करायचे. सरपंचांवरील ही कारवाईची भाषा खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे,

पिचड यांनी म्हटले आहे, की आपणास अनेक सरपंचांचे फोन आले असून, काही सरपंचांना मारहाण, तर काहींवर पदे घालविण्याची दमबाजी सुरु आहे. राजकीय आकसापोटी कारवाई होत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. आज अकोले तालुक्यात राजूर ग्रामपंचायतबाबत शोषल मीडियावर संभाषण व्हायरल झाले असून, या संभाषणात लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून चांगले काम करणाऱ्या लोकांना नोटिसा व पदे घालविण्याची भाषा करीत असेल, तर ही निषेधार्ह बाब आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांना भेटून निवेदन करणार आहोत,

तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोक येत असून, त्यांचे नियोजन स्थानिक सरपंचांनी प्रामाणिकपणे केले आहे, तर राजूरमध्ये दिवसरात्र सरपंच व त्यांची कमिटी पोलीस यंत्रणा, सक्षमपणे काम करीत आहेत, त्यासाठी ग्रामपंचयतला कोणताही निधी नाही. घरपट्टी, पाणीपट्टी व स्थानिक लोकवर्गणीतून नियोजनाचा खर्च चालू आहे, अशावेळी मदत तर नाहीच. पण राजकीय आकसापोटी कारवाई भाषा व तेही शोषला मीडियावर जाहीरपणे काम करूनही त्याबदल्यात त्यांना सरकार व प्रशासनाने सरक्षणसाठी ना किट ना साधा रुमाल दिला नाही. मात्र अधिकारी, त्यांच्यावर दडपण आणून राजकीय लोकांचे ऐकून कारवाईची भाषा करतात, हे कितपत योग्य आहे. अकोलेचे नव्हे, तर राज्यात ही स्थिती आहे. ठिकठिकाणी कोरोना योध्याचे सत्कार होत आहेत, परंतु गावपातळीवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या योध्याच्या डोक्यावर टांगती तलवार व सरकारचे प्रतिनिधी ठेवून वेठीस धरत आहे. मग त्यांनी काम कसे करायचे, असेही वैभव पिचड म्हणाले. 

राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांना स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला. प्रत्येक गावचे सरपंच जीवओतून कोरोनायोद्धा बनून काम करीत असताना केवळ राजकीय आकसापोटी ही कारवाई होत आहे. त्या विरोधात काही सरपंचांनी पिचड यांना फोन केले. त्यानुसार त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख