शिवाजी कर्डिले रमले पंतप्रधानांच्या आठवणीत ! पंढरीत वारकरी येतात तसे मोदींच्या सभेला लोक स्वयंस्फूर्तीने आले - People came to Prime Minister Modi's meeting just as Warakaris come to Pandharpur voluntarily | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी कर्डिले रमले पंतप्रधानांच्या आठवणीत ! पंढरीत वारकरी येतात तसे मोदींच्या सभेला लोक स्वयंस्फूर्तीने आले

मुरलीधर कराळे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मागील वर्षी 12 एप्रिल 2019 हा दिवस नगरकरांना अविस्मरणीय ठरला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील व शिर्डीतील उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा नगरला झाली.

नगर : ``निवडणुकांच्या सभा म्हटलं की गर्दी जमविण्यासाठी गाड्या पाठविणे, लोकांना बोलाविण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधणी अशा अनेक गोष्टी नेत्यांना कराव्या लागतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा अनुभव वेगळा होता. पंढरीच्या पांडुरंगाला भाविक स्वयंस्फुर्तीने येतात, तसे मोदींच्या सभेला लोक आले. ही सभा अविस्मरणीय ठरली,`` अशा आठवणी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीचे अनुभव सांगताना कर्डिले म्हणाले, की मागील वर्षी 12 एप्रिल 2019 हा दिवस नगरकरांना अविस्मरणीय ठरला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील व शिर्डीतील उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा नगरला झाली. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या सभेची तयारी पंधरा दिवस आधी सुरू होती. मोदी यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता होती. मोदी येण्याच्या आधी मी व इतर आमदारांनी भाषण केले होते. लोकांमध्ये मात्र मोदी यांच्याच भाषणाची उत्सुकता होती. 

मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताना `भारत माता की जय`, असा जयघोष झाला. त्यावेळी मोदी यांच्याविषयीचे प्रेम, देशप्रेम ओतप्रोत वाहून आले होते. ते लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. 

शिर्डीतील साईबाबांच्या आर्शीवाद असलेल्या नगरला माझे नमन, असे म्हणताच लोकांनी टाळ्यांचा कटकडाट केला. उद्याच्या श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा, असे म्हणत मला नगरकरांनी खूप प्रेम दिले, असा गाैरव मोदी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी हिंदीत भाषण करण्यास सुरूवात केली. तब्बल २८ मिनीटे सुरू असलेले हे भाषण लोकांनी शांतपणे एेकले. लोकांशी संवाद साधत त्यांनी बोलते केले. अनेक घोषणा लोकांना द्यायला लावल्या. त्यामुळे हे मोदींची सभा नगरकरांना अविस्मरणीय अशीच झाली. 

सभेच्या अनेक जबाबदाऱ्या होत्या

मोदी यांच्या सभेच्या सर्व नियोजन केंद्रीय टीम करीत असते. असे असले, तरी लोकांमध्ये सभेबाबत प्रचार करणे, सभेस आलेल्या लोकांच्या विविध सुविधांबाबत नियोजन आमच्याकडे होते. हे करीत असताना खूप वेगळा अनुभव आला. मोदी यांचे भाषण युवकांना विशेष भावल्याचे जाणवले. पंतप्रधानांना पाहण्यासाठीच नव्हे, तर त्यांचे भाषण प्रत्यक्ष अनुभवणे हा अनुभव रोमांचकारी होता, असे कर्डिले यांनी सांगितले.

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख