जामखेड शहर स्वच्छ व सुंदरतेसाठी पवार कुटुंबिय सरसावले - The Pawar family moved for a clean and beautiful city of Jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

जामखेड शहर स्वच्छ व सुंदरतेसाठी पवार कुटुंबिय सरसावले

वसंत सानप
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

'स्वच्छ सर्वेक्षण अभियान' च्या निमित्ताने कर्जत- जामखेड ही दोन्ही शहरे दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त होऊन अव्वलस्थानी यावेत, यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पाठोपाठ जामखेड शहरातही कामाला सुरूवात केली आहे.

जामखेड : दरम्यान, आमदार रोहित पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर त्यांचे वडील अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे दोन्ही तालुक्यातील शेतीची उत्पादकता वाढावी व शेतकऱ्यांना अधिकचे आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार मतदारसंघातील कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपालिकेचे कार्यक्षेत्र असणारी ही दोन्ही शहर स्वच्छ व्हावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत

सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषदेत शहर स्वच्छतेविषयी माहिती दिली. आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं, आपलं आरोग्य चांगल राहवं, यासाठी 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान' च्या निमित्ताने कर्जत- जामखेड ही दोन्ही शहरे दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त होऊन अव्वलस्थानी यावेत, यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पाठोपाठ जामखेड शहरातही कामाला सुरूवात केली आहे.

जामखेेड येथील प्रभागनिहाय बैठका घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानात विविध संघटना, व्यापारी, डॉक्टर संघटना व अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन आपले योगदान द्यावे," असे अवाहन पवार यांनी केले.

पहिल्या टप्प्यात दोन्ही शहरातून वाहणाऱ्या नद्या स्वच्छ करण्याचे काम त्यांच्याच पुढाकारातून झाले. नदीच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांचे अतिक्रमण व साचलेला गाळ हे सर्व काढून नदीच रूप पालटलं, या नद्या वाहत्या झाल्या आणि शहराच्या लगत साचलेले दुर्गंधीचे साम्राज्य पूर्णपणे वाहून गेले.

आता शहराच्या मध्यवर्ती असलेली अस्वच्छतेचे साम्राज्य समूळ नष्ट करण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेचे अभियान हाती घेतले आहे. यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील प्रभाग निहाय नागरिकांच्या बैठका घेऊन या अभियानामध्ये   सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आज जामखेड येथील पत्रकार परिषदेत केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख