नगर शहरातील हा भाग झाला `सील'

कंटेन्मेंट झोन परिसरात दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदी महापालिका प्रशासन योग्य शुल्क आकारून पुरविणार आहे. या क्षेत्रातील बॅंका बॅंकिंग सुविधा आपल्या प्रतिनिधींमार्फत पुरविणार आहेत.
Corona
Corona

नगर : शहरातील जुन्या मंगळवार बाजार परिसरात रिक्षाचालक आणि त्याचे कुटुंबीय कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने हा परिसर 4 जूनपर्यंत कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील कोणतीही दुकाने उघडता येणार नाहीत.

महापालिका प्रशासनाला या भागात जीवनावश्‍यक वस्तू पुरवाव्या लागणार आहेत. त्याशेजारील भाग "बफर झोन' करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिका प्रशासनाला दिला. त्यामुळे जुन्या नगर शहराच्या मोठ्या भागातील दुकाने प्रशासनाने बंद केली. नागरिकांना घराबाहेरही पडता येणार नाही. 

शहरातील रामचंद्र खुंट व जुना मंगळवार बाजार परिसरात प्रत्येकी एक कोरोनाबाधित गुरुवारी आढळून आला. रामचंद्र खुंट परिसर "हॉट स्पॉट'मध्ये आहे. जुना मंगळवार बाजार परिसरही आज महापालिका प्रशासनाने "सील' केला. हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना या भागात प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू व इतर मदतीसाठी 24 तास सुरू राहणारा कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून, या परिसरात ये-जा करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. 

कंटेन्मेंट झोन परिसरात दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदी महापालिका प्रशासन योग्य शुल्क आकारून पुरविणार आहे. या क्षेत्रातील बॅंका बॅंकिंग सुविधा आपल्या प्रतिनिधींमार्फत पुरविणार आहेत. कंटेन्मेंट झोन व बफर झोनमधील नागरिकांना आपली खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. केवळ शनी चौकातील रोहित्राजवळील रस्ता जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्‍तांनी आज सकाळी या परिसराची पाहणी केली. सायंकाळी पाच वाजता हा परिसर "सील' करण्यात आला. 

कंटेन्मेंट झोन 
जुने महापालिका कार्यालय चौक, डॉ. होशिंग हॉस्पिटल चौक, शनी चौक, तख्ती दरवाजा मशीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बॅंक ते जुने महापालिका कार्यालय चौक. 

बफर झोन 
यतीम खाना बिल्डिंग, न्यामतखानी मोहल्ला, निंबाळकर गल्ली, तवकल वस्ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घुमरे गल्ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलिस ठाणे, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्ली, जुना बाजार रस्ता, पटवेकर गल्ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, महापालिका अग्निशमन कार्यालय, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल. 

संगमनेर आता 1 जूनपर्यंत "हॉट स्पॉट' 
दरम्यान, कोरोना रुग्ण सापडल्याने संगमनेर शहर 23 मेपर्यंत "हॉट स्पॉट' घोषित करण्यात आले होते. मात्र, 19 मे रोजी संगमनेरमधील रहिमतनगर, इस्लामपुरा भागात आणखी दोन कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी "हॉट स्पॉट'ची मुदत 1 जूनपर्यंत वाढविली. "हॉट स्पॉट'मध्ये शहरातील रहिमतनगर, उम्मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती, इस्लामपुरा, कुरण रस्ता, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा या भागाचा समावेश आहे. बफर झोनमध्ये भारतनगर, जुना जोर्वे रस्ता, अलकानगर, खोलेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, बिलाल नगर, पुनर्वसन कॉलनी या क्षेत्राचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com