मधुकर पिचड यांना येथे दिसला पांडुरंग

भविष्यात तुमचे नातू, पणतू यांना खाण्यासाठी फळे कामे येतील. पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीची कास धरून आदर्श शेती करा. व्यसनापासून दूर राहा.
3MADHUKAR_PICHAD_0.jpg
3MADHUKAR_PICHAD_0.jpg

अकोले : या वर्षी पंढरीला जायला मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. आपली काळी आई, शेती हीच पंढरी आणि डोलणारी पिके हाच आपला पांडुरंग समजून सेंद्रिय शेती करा. जोडधंदा म्हणून दुध वाढवा, झाडे लावा, झाडे वाढवा, प्रत्येक बांधावर आंबा, चिकू, पेरू ही फळपिके घ्या, असा संदेश माजी आमदार मधुकरराव पिचड यांनी दिला.

आषाढी एकादशिनिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. राजूर ग्रामस्थांच्यावतीने आदर्श शेतकरी शांताराम बारामते यांना आज गाैरविण्यात आले. या वेळी माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे, सरपंच गणपत देशमुख, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदी उपस्थित होते. ऍग्रोवन वृत्तपत्राची फ्रेम  केशर आंब्याचे रोप देऊन त्यांचा माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पिचड म्हणाले, की भविष्यात तुमचे नातू, पणतू यांना खाण्यासाठी फळे कामे येतील. पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीची कास धरून आदर्श शेती करा. व्यसनापासून दूर राहा. पेरणी व शेतीकाम मनरेगा व रोजगार हमीतून घेऊन गरीब शेतकऱ्यांना मदत करावी. म्हणजे त्याच्या हाताला काम मिळेल व कुटुंबही स्थिरावेल. ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय चांगला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी जंगलातच पांडुरंगाला पहावे. जंगल वाचविणे, वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संतांच्या वचनाप्रमाणे आपल्या रोजच्या शेतीच्या कामात पांडुरंग पहा. विळ्या-भोपळ्यात पांडुरंग पहा. तरच आदर्श शेती करता येईल. दरवर्षी पंढरीला वारी असली, तरी या वर्षी त्यात खंड पडत आहे. असे असले, तरी आपल्या घरातच पांडुरंगाची पूजा करावी, असा सल्ला पिचड यांनी दिला.

आमचे पांडुरंग तुम्हीच

साहेब तुम्ही आम्हाला पाणी दिले, त्यामुळेच आमचे शेती शिवार फुलले. आज पोटापुरते का होईना, आमचा भाजीपाला, सेंद्रिय शेती, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळीपालन हे व्यवसाय सुरू आहेत. तुम्ही एकदा आमच्याकडे या. कारण आमचे पांडुरंग तुम्हीच आहात. पाणी नसते, तर आमच्या शिवारात काट्या नि बाभळी सोडून काहीच नसते. आपल्या दूरदृष्टीमुळेच अकोले तालुक्यातील जनतेमध्ये चांगले दिवस आले आहेत. आदिवासींचा विकास झाला आहे, असे उपस्थित शेतकरी पिचड यांना बोलत होते.

दरम्यान, पिचड यांनी केलेल्या या मार्गदर्शनामुळे त्यांचे एक प्रकारे प्रवचनच झाले. या वेळी लोक तल्लीन होऊन पिचड यांचे भाषण ऐकत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com