नगरमध्ये 511 कोरोना रुग्णांची भर - Over 511 corona patients in the town | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगरमध्ये 511 कोरोना रुग्णांची भर

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 49 हजार 678 झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज रूग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 304 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 117, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 126 आणि अँटीजेन चाचणीत 268 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 45, अकोले 15, जामखेड 3, कर्जत 4, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 14, नेवासा 2, पारनेर 5, पाथर्डी 3, राहाता 3, राहुरी 3, श्रीगोंदा 6, मिलिटरी हॉस्पिटल 5 इतर जिल्हा 1अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 126 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 46, अकोले 1, जामखेड 3, कर्जत 2, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 15, नेवासा 9, पारनेर 3, पाथर्डी 6, राहाता 9, राहुरी 12, संगमनेर 7, शेवगाव 3, श्रीरामपूर 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 268 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 8, नेवासे 9, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदे 7, श्रीरामपूर 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 49 हजार 678 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख