नगर जिल्ह्यात रुग्ण 30 हजारांवर, उपचार सुरू असलेल्यांची संख्या वाढली - Over 30,000 patients in Nagar district, the number of patients undergoing treatment has increased | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात रुग्ण 30 हजारांवर, उपचार सुरू असलेल्यांची संख्या वाढली

मुरलीधर कराळे
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 444 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल नव्याने 856 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज 800 च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत.

नगर : नगर जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत 29 हजार 514 एकूण कोरोना रुग्ण संख्या झाली आहे. तसेच बरे झालेले रुग्ण 24 हजार 731 असून, सध्या 4 हजार 339 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन ते तीन हजारांच्या दरम्यान होती. तिच्यात आता वाढ झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 444 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल नव्याने 856 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज 800 च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. तसेच मृत्यूची संख्याही रोज 10 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती उद्भवू लागली आहे. राहुुरी, जामखेड आदी शहरात लाॅकडाऊन करण्यात आले असून, श्रीरामपूरलाही करण्याबाबत व्यापारी व नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात काल ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. काल जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३८ आणि अँटीजेन चाचणीत २४५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८,  पाथर्डी ४,, नगर ग्रामीण २०, कॅंटोन्मेंट ३,  नेवासा २३, पारनेर १, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२,  जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६०, संगमनेर ३०, राहाता ४१, पाथर्डी १,  नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर ६४,  कॅंटोन्मेंट ७, नेवासा १६, श्रीगोंदा ४, पारनेर १८,अकोले ५, राहुरी ४१,  शेवगाव ३, कोपरगांव ९, जामखेड २ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत २४५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४२, संगमनेर ९, राहाता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १०, पारनेर ७, अकोले २०, राहुरी ३, कोपरगाव ९, जामखेड १६ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख