सुपे, हंगे औद्योगिक वसाहत प्रश्नावर आमदार लंके यांनी सुचविला हा पर्याय - This option was suggested by MLA Lanka on the question of Supe, Hange industrial estate | Politics Marathi News - Sarkarnama

सुपे, हंगे औद्योगिक वसाहत प्रश्नावर आमदार लंके यांनी सुचविला हा पर्याय

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

आम्ही पिढ्यान पिढ्या शेती व्यावसाय करत आहोत, शेतीशिवाय आम्हाला दुसरे उत्पनानाचे साधन नाही. आमची शेती गेली, तर आम्ही पोट कसे भरणार, त्यामुळे आम्हाला आत्महत्तेशिवाय पर्याय नाही.

पारनेर : माझ्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. सुपे, हंगे शिवारातील जागा एमआयडीसीस योग्य नाही. या पेक्षा ढवळपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात खडकाळ व नापिक जमिन आहे, तेथे एमआयडीसीस पाहिजे तेवढी जागा देऊन तिकडे या वसाहतीची तिसरा फेज तेथे सुरू करावा, असे आमदार निलेश लंके यांनी सांगून ते या प्रश्नी शेतकऱ्यांसोबत राहिले.

सुपे व हंगे शिवारात नव्याने होऊ घातलेली फेज थ्री एमआयडीसी च्या हरकतींवर आज सुपे येथे एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी हरकतींवर सुनावणी घेऊन शेतकऱयांचा विरोध का आहे, या बाबतची कारणे ऐकूण घेतली. तसेच या वेळी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा लेखी नकारही घेतला.

हेही वाचा... आमदारांच्या कुटुंबियांसाठीच जिल्हा बॅंक आहे का

आम्ही पिढ्यान पिढ्या शेती व्यावसाय करत आहोत, शेतीशिवाय आम्हाला दुसरे उत्पनानाचे साधन नाही. आमची शेती गेली, तर आम्ही पोट कसे भरणार, त्यामुळे आम्हाला आत्महत्तेशिवाय पर्याय नाही. आमचा अख्खा गाव भूमिहिन होईल, अशा अनेक हरकती घेत सुपे येथील फेज थ्री मधील औद्योगिक वसाहतीस शेतकऱयांनी कडाडून विरोध केला.

सुपे व हंगे शिवारात सुमारे 835 हेक्टरवर नव्याने एमआयडीसीची तिसरा फेज सुरू होत आहे, त्यासाठी जमिनीचे अधिगग्रहण करण्यात येणार आहे. मात्र या एमआयजीसीस शेतकऱयांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. ही वसाहत होऊ नये, त्यासाठी सुमारे 282 शेतकऱ्यांनी हरकती घतेल्या होत्या. त्या हरकतींवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पोटतिडकीने आपल्या व्यथा व्यक्त केल्या. तसेच एमआयडीसी का होऊ नये, हेही या वेळी सांगितले. 

हेही वाचा... भाजपमध्ये आता युवा वारिअर्स

हंगे येथील तलावावर सुमारे पाच गावांची पाणी योजणा आहे, तीही या एमआयजीसीमुळे धोक्यात येवून आमच्या गावातील अनेकांच्या जमिनी यापुर्वीही एमआयजीसीत गेल्या आहेत. प्रत्येक वेळी आम्हीच का जमिनी देऊ, आम्हीच का त्याग करावा, आमचा अख्या गाव भूमिहिन होईल, अशी व्यथा माजी सरपंच राजू शिंदे यांनी मांडली.

अनेक शेतकऱयांनी आम्ही अधिकाऱ्यांना या परिसरात फिरकू देणार नाही. यातून काही वेगळे अघटीत घडले, तर त्यास सरकारी अधिकारीच जबाबदार असतील, असे सांगत शंभर टक्के आमचा विरोध आहे. आम्हाला पैसे नकोत, आमची जमिन हीच आमची काळी आईे आहे, तीच आमचे पिढ्यान पिढ्या पालान पोषण करत आली आहे, आता आमच्या जमिनी घेऊन आमाच्या मुलांना भूमिहिन करून भिकारी करू नका, असेही अनेकांनी सांगितले.

आता आम्ही एमआयडीसी होऊ देणार नाही, आम्ही शेवटपर्यंत एमआयडीसीस विरोध करू, असा निर्धार अनेकांना या वेळी व्यक्त केला.  दरम्यान, या प्रकाराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख