नगर महापालिकेत या पाच जणांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी - Opportunity for these five to be sanctioned corporators in the Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगर महापालिकेत या पाच जणांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी

मुरलीधर कराळे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

शिवसेनेकडून मदन आढाव व संग्राम शेळके, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विपुल शेटिया व डाॅ. राजेश कातोरे, तर भाजपकडून रामदास आंधळे हे स्वीकृत नगरसेवक झाल्याचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केले.

नगर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी पाज जणांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या नावांप्रमाणे ही यादी मंजूर झाल्यानंतर महापाैरांनी ही नावे जाहीर केली.

शिवसेनेकडून मदन आढाव व संग्राम शेळके, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विपुल शेटिया व डाॅ. राजेश कातोरे, तर भाजपकडून रामदास आंधळे हे स्वीकृत नगरसेवक झाल्याचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केले.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून खल सुरू झाला होता. त्यात राजकारण होऊन काही माजी नगरसेवकांनी आपल्यालाल संधी मिळण्याचा चंगच बांधला होता. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांपर्यत काहींनी तक्रारीही केल्या होत्या. भाजप व शिवसेनेने यापूर्वी दिलेली नावेच पुन्हा दिल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने विपुल शेटिया यांचे पुर्वीचे नाव कायम ठेवत नव्याने डाॅ. कातोरे यांही संधी दिली. 

विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले यांना हुलकावणी

शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या कामाचे नुकत्याच झालेल्या श्रद्धांजली सभेत काैतक करून नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली, मात्र त्यांचे पूत्र असलेले माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना स्विकृत नगरसेवकपदावर संधी मिळू शकली नाही. 

भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे पूत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनाही संधी मिळावी, असा सूर गांधी गटातून होता, तथापि, भाजपकडे एकच जागा असल्याने रामदास आंधळे यांचे पुर्वीचेच नाव निश्चित ठेवून गांधी यांनाही संधी मिळू शकली नाही. किशोर डागवाले यांचेही नाव चर्चेत होते, तथापि, त्यांनाही या पदाने हुलकावणी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख