सातपैकी एकच अर्ज, घोडसरवाडीची निवडणूक रद्द  - Only one out of seven applications, Ghodsarwadi election canceled | Politics Marathi News - Sarkarnama

सातपैकी एकच अर्ज, घोडसरवाडीची निवडणूक रद्द 

शांताराम काळे
गुरुवार, 7 जानेवारी 2021

घोडसरवाडी येथे अनुसूचित जमातीचे सात कुटुंब असून, त्यांच्यासाठी 4 जागा सोडण्यात आल्याने इतरांनी या आरक्षणावर हरकत घेऊन न्यायालयात जाणे पसंद केले, त्यामुळे तेथे केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे.

अकोले : तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून 14 जागांवर उमेदवारी अर्जच न आल्याने त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, तर घोडसरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने, ही निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली. 

चैतन्यपूर- 1, कळंब- 1, भोलेवाडी- 3, शेरणखेल- 1, जाचकवाडी- 1, तसेच घोडसरवाडी येथे 6 अर्ज आले नाही. अशा 14 ठिकाणी उमेदवारी अर्ज न भरले गेल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी तेथील जागा रिक्त ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. 
घोडसरवाडी येथे अनुसूचित जमातीची सात कुटुंबे असून, त्यांच्यासाठी चार जागा सोडण्यात आल्याने, इतरांनी या आरक्षणावर हरकत घेऊन न्यायालयात जाणे पसंत केले. त्यामुळे तेथे केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. तहसीलदारांनी ही निवडणूक रद्द केली असून, अन्य निवडणुका संपल्यानंतर तेथील निवडणूक घेण्यात येणार आहे. तालुक्‍यात 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 45 हजार 367 पुरुष व 42 हजार 96 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
272 जागांसाठी 553 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर दीड हजार कर्मचारी व राखीव तीनशे कर्मचारी, असे एक हजार 800 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असणार आहेत. अगस्ती मंगल कार्यालयात नुकतेच त्यांचे प्रशिक्षण झाले असून, 33 निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत, अशी माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली. 

 

हेही वाचा...

आदिवासी युवकांनी योजनांचा लाभ घ्यावा

अकोले : आदिवासी उपयोजना ही बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार योजना असून, योग्य लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. किरण लाहामटे यांनी राजूर येथील आदिवासी विकास कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने टपरी, टेबल, स्टूल, शिलाई मशीन वाटप आमदार डाॅ. किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे आदींच्या उपस्थित झाला. या वेली लहामटे यांनी मार्गदर्शन केेल.

सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे असून, आदिवासी समाजाच्या विकासासाठी निश्चित भरीव मदत प्राप्त झाली आहे. वाडी वस्तीतील जनतेने विविध योजनांचा उपयोग करून आपले जीवनमान सुधारावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख