केवळ पत्ता जामखेडचा, संसर्ग मात्र बाहेरचाच, तालुका होतोय पुन्हा सतर्क - Only the address of Jamkhed, but the patient is outside, the taluka is becoming alert again | Politics Marathi News - Sarkarnama

केवळ पत्ता जामखेडचा, संसर्ग मात्र बाहेरचाच, तालुका होतोय पुन्हा सतर्क

वसंत सानप
बुधवार, 29 जुलै 2020

या वेळी सापडलेल्या रुग्णांची 'हिस्ट्री' केवळ जामखेडच्या पत्त्याशी मिळतीजुळती आहे. या रुग्णांचे बाधित क्षेत्र अन्य ठिकाणचेच असल्याचे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या क्षेत्रावरुन स्पष्ट होते.

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेडकरांच्या मागील साडेसातीच्या फेऱ्याने पुन्हा डोके वर काढले आहे. या वेळी सापडलेल्या रुग्णांची 'हिस्ट्री' केवळ जामखेडच्या पत्त्याशी मिळतीजुळती आहे. या रुग्णांचे बाधित क्षेत्र अन्य ठिकाणचेच असल्याचे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या क्षेत्रावरुन स्पष्ट होते.

जामखेडला परदेशी नागरिकांनी कोरोना आणला. त्यात भर घातली मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागात असलेल्या येथील स्थलांतरित नागरिकांनी. मंगळवारी (ता. 28) जामखेडला तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी वरुन स्पष्ट झाले असले, तरी त्यांना संसर्ग जामखेडला नाही, तर अन्यत्र झाल्याचे दसून येते.

तालुक्यातील फक्राबाद येथील रहिवासी असलेला एक रुग्ण नगर येथे मागील दहा दिवसांपासून इतर आजाराच्या उपचारार्थ दाखल होता. जामखेडच्या शिऊर रस्त्यावर आढळलेला रुग्ण पनवेल येथून आलेला आहे. तर खर्डा येथील रुग्ण नगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहे, मात्र त्यांनी कायमस्वरूपी वास्तव्यासाठी दिलेला पत्ता खर्डा येथील आहे. त्यामुळे यावेळीही आढळलेल्या रुग्णांचे ससंर्ग होण्याचे क्षेत्र अन्यत्र असल्याचा दावा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी मयत झालेली खर्डा येथील महिला रुग्णाचा अन्य आजाराच्या उपचारार्थ बार्शी (जि. सोलापूर) येथे प्रवास सुरु होता. बार्शी हे रेड झोन क्षेत्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. या दरम्यानच त्या महिलेला संसर्ग झाला आणि पुढे उपचारादरम्यान त्यांचा बार्शी येथेच म्रत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार नाईकवाडे यांनी दिली. जामखेड चा पत्ता दर्शविणारे तिघेजण नव्याने सापडले असून, ही संख्या चारवर पोहचली आहे.

जामखेडला सुरुवातीपासून मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागात रोजगार, व्यवसाय व नोकरीच्या विविध भागात तात्पूर्त्या स्वरूपात स्थालांतरित झालेल्या येथील रहिवाशांचा त्रास सोसासावा लागला आहे. हे सर्वजण सुरक्षित क्षेत्र म्हणून त्यांच्या कर्तव्याच्या क्षेत्राहून जामखेड तालुक्यात आलेले आहेत आणि येताना त्यातील काहींनी कोरोनाचा वाणवळा जामखेडला आणला. जामखेडच्या नावावार आढळलेल्या कोरोनाच्या बाधित रुग्ण संख्येत मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या तसेच येथून राज्याच्या विविध भागात प्रवास झालेल्या व्यक्तींचाच समावेश झालेला आहे. कोरोनाशी सामना करिताना जामखेड पॅटर्नमध्ये अंतरभाव असलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये काही नवीन उपाययोजनांची समावेश व्हायला हवा.

खबरदारीच्या उपाययोजना

- मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांनी आहे तेथेच रहावे. स्वतःची व कुटुबाची काळजी घ्यावी.

- मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांची माहिती दक्षता समितीने लपवू नाही. तात्काळ प्रशासनाला कळवावे व त्यांना क्वारंटाईन करावे.

- होम क्वारंटाईन, फार्महाऊस क्वारंटाईनच्या नावाखाली शोधल्या जाणाऱ्या पळवाटेला आळा घालावा.

- जामखेड तालुक्याला जोडणार्या जिल्हासरहद्दीवरील सर्व चेक पोष्ट 'कडक' करावेत.

- शहरात व मोठ्या गावात  रस्त्यावर,चौकात विनाकारण होणारी गर्दी थांबवावी.

- सरकारी अथवा खासगी रुग्णालयात अन्य आजाराच्या निमित्ताने उपचारार्थ दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन क्वारंटाईन करावे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख