आमदार लंके यांच्या प्रय़त्नातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण - Online training for students through the efforts of MLA Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंके यांच्या प्रय़त्नातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

मार्तंड बुचुडे
बुधवार, 22 जुलै 2020

पारनेरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थांना डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी आमदार लंके यांच्या सहकार्याने `टीच अँड लर्न फॉर्म होम` ही संकल्पना राबविली जात आहे.

पारनेर : पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यातील सामान्यतील सामान्य कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षण मिळावे, यासाठी तालुक्यातील जिल्हापरीषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास शिक्षण प्रणाली सुरू करून करण्यात आली आहे. शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण दिले असून, लवकरच सर्व विद्यार्थ्यांना या प्रणालीचा वापर करता येणार आहे.

पारनेरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थांना डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी आमदार लंके यांच्या सहकार्याने `टीच अँड लर्न फॉर्म होम` ही संकल्पना राबविली जात आहे. तालुक्यातील सुमारे सात हजार विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे. लंके यांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्याला दिशा देणारा ठरणार आहे. असा उपक्रम सरकारनेही राज्यातील जिल्हापरिषद शाळांमधून राबविणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरसाच्या महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, मात्र सध्या शिक्षक डिजिटल व्हाट्स अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवित आहेत. परंतु होम लर्निंगसाठी व्हाट्स अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारा अभ्यास खरोखर उपयुक्त ठरत आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमिवर लंके यांनी हा नवीन उपक्रम तालुक्यासाठी सुरू केला आहे.

`टीच अँड लर्न फॉर्म होम`साठी  आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाउंडेशनने ऑनलाईन शाळा नावाचा डिजिटल फ्लॅटफॉर्म तयार केला आहे. याच्या मदतीने शिक्षक आपला पाठ प्लॅन विद्यार्थ्यांच्या घरच्या स्मार्टफोनवर ब्रॉडकास्ट करू शकतील. तसेच विद्यार्थ्यांचा लर्निंग प्रोग्रेस व युजेस ट्रॅक करून विद्यार्थीखऱोखर शिकत आहे का, हेही पाहू शकतील. 

या उपक्रमांत सहभागी मुलांना व ज्यांच्याकडे  स्मार्ट फोन आहे, अशा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी  शिक्षण विभागामार्फत स्मार्ट फोन असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वानुसार तालुक्यातील सुमारे 7 हजार 192 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन असल्याचे समजले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणासाठी तालुक्यात सुरू झालेला उपक्रम निश्चितच राज्याच्या शिक्षण विभागासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. 

शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील दोन तंत्रस्नेही शिक्षकांना व सर्व केंद्रप्रमुखांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. हे तंत्रस्नेही शिक्षक आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. शाळा पातळीवर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल करून त्याचा प्रत्यक्ष वापरा विषयी माहिती देण्यात येणार आहे.

आगामी काळात माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनाही लाभ : लंके

हा उपक्रम सध्या प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचा प्रय़त्न आहे. आगामी काळात माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठीही असाच उपक्रम राबवून तालुक्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा प्रयत्न आहे, असे मत आमदार निलेश लंके यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख