एका पक्षाने डावलले, की मी दुसऱ्या पक्षात उडी मारतो

डॉ. विखे पाटील यांना विचारणा करताच ते म्हणाले, की माझेही काही खरे नाही.मला कोणत्याही पक्षाने डावलले, की मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो..! यावर एकच हशा पिकला.
sujay Vikhe
sujay Vikhe

राशीन : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची आढावा बैठक झाली. त्या वेळी भाजपसोबत असलेली शिवसेना कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याबाबत डॉ. विखे पाटील यांना विचारणा करताच ते म्हणाले, की माझेही काही खरे नाही. मला कोणत्याही पक्षाने डावलले, की मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो..! यावर एकच हशा पिकला. 

कोरोनाबाबत डॉ. विखे पाटील म्हणाले, ""जगायचे आहे, तो स्वत:ची काळजी घेईल. ज्याला मरायचेय, त्याला कोठेही फिरू द्या. कोरोनाचा सामना मोठ्या धैर्याने करावा लागेल. गाव सुरू ठेवायचे की बंद, यासाठी गावकऱ्यांनी हिमतीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्रशासन, गावकऱ्यांनी एकदिलाने काम करावे. पाणी, स्नानगृह व शौचालयाची सुविधा असणाऱ्या ठिकाणी क्‍वारंटाईन केंद्र तातडीने हलवा. दुर्दैवाने आमच्या पक्षाचे सरकार राज्यात नाही. मात्र, तुम्हाला चांगला निधी आणणारा आमदार मिळाला आहे. सध्या राज्यात त्यांची सत्ता आहे. येथील समस्या पत्राद्वारे मी आमदार रोहित पवार यांच्या कानावर घालीन. त्यांनी त्या सोडवाव्यात.''

गावे उघडू द्या, मी किट वाटतो 
"आमदार रोहित पवार यांनी कांदा-बटाट्याचे वाटप केले. तुम्ही धान्यवाटप करा,' असे आवाहन अल्लाउद्दीन काझी यांनी केले. त्यावर डॉ. विखे पाटील म्हणाले, ""सर्व गावे उघडू द्या. जातीने येऊन मी माझे किट वाटणार आहे. कारण, लोकांना समजू द्या; देणारा कोण आहे, नाही तर उद्या दुसराच त्याचे श्रेय घेऊन जाईल.'' 

हेही वाचा...

जिल्ह्यातील 19 डॉक्‍टर मालेगावच्या सेवेत 

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील नागरिकांना सेवा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील 19 डॉक्‍टर मालेगावला रवाना झाले असून, यानिमित्ताने आता नगरकर मालेगावकरांच्या आरोग्यसेवेत दाखल होत आहेत. 

मालेगाव महापालिकेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने तेथील जनतेस रुग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील 19 वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गट आजपासून सात दिवसांसाठी मालेगाव येथे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कोपरगाव तालुक्‍यातील 15 डॉक्‍टरांचा समावेश आहे. या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मालेगाव येथे रुजू होण्यासाठी उपसंचालक स्तरावरून आज नगर जिल्ह्यातून कार्यमुक्तही करण्यात आले आहे. यापैकी जे वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे आज (मंगळवारी) रुजू होणार नाहीत, त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिल यांना प्रस्ताव पाठवण्यात येईल, तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com