शंभर कोटीच्या निधीचे शंभर नंबरी स्वागत ! मंत्री गडाखांच्या नावाने मिठाई वाटप  - One hundred crore fund welcome number one hundred! Distribution of sweets in the name of Minister Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

शंभर कोटीच्या निधीचे शंभर नंबरी स्वागत ! मंत्री गडाखांच्या नावाने मिठाई वाटप 

विनायक दरंदले
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शासनस्तरात आपली पावर वापरत नेवासे तालुक्यासाठी आणलेल्या शंभर कोटी रुपये निधीचे सोनईत शंबर नंबरी स्वागत करण्यात आले.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शासनस्तरात आपली पावर वापरत नेवासे तालुक्यासाठी आणलेल्या शंभर कोटी रुपये निधीचे सोनईत शंबर नंबरी स्वागत करण्यात आले. 

मंत्री गडाख यांनी तालुक्यातील रस्ते कामाचा आराखडा तयार करुन शासनाला सादर केला होता. यामध्ये प्रमुख रस्त्यासह काही गावातील रस्ते होते. कोरोना स्थिती व लाॅकडाऊन मध्ये मंजुरी व निधी अडकला होता.आज शासनस्तरावर प्रशासकीय मंजुरी व निधी आल्याचे जाहीर होताच सर्वत्र आनंदी आनंद व्यक्त होत आहे. 

सोनई येथील शिवाजी चौकात महावीर चोपडा, किरण दरंदले, अतुल शिरसाठ, प्रदीप घावटे व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे मिठाई वाटप व फटाके फोडून स्वागत केले आहे. सोनई- घोडेगाव रस्त्या, सोनई- मोरयाचिचोंरे रस्ता व गावातील कौतुकी नावा ते विवेकानंद चौक रस्त्यास निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारपासुन शंभर कोटीचा निधी सोशलमिडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे. 
 

हेही वाचा..

नगरचा पाणीपुरवठा होणार विस्कळित 

नगर : महावितरण व महापारेषण कंपनीच्या तांत्रिक कामासाठी शनिवारी (ता. 6) शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनीकडून 33 केव्ही मुळा डॅम वाहिनीचे तातडीचे तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता. 6) दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शटडाउन घेतला आहे. या वेळेत पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. मुळानगर, विळद येथून होणारा पाणीउपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी टाक्‍या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी (ता. 6) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच स्टेशन रस्ता, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसराला दुपारी 12 नंतरच्या पाणीवाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तेथे रविवारी (ता. 7) पाणीपुरवठा होईल. 

रविवारी रोटेशननुसार सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लाल टाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रस्ता, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता परिसर, सावेडी भागात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागाला सोमवारी (ता. 8) पाणीपुरवठा करण्यात येईल. 
सोमवारी (ता. 8) पाणीपुरवठा होऊ घातलेल्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडी गेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी भागात पाणीपुरवठा होणार नसून, तो मंगळवारी (ता. 9) करण्यात येईल. 

Edited By - Murliedhar ;Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख