प्रसंगी अण्णा हजारे आयुष्यातील शेवटचे आंदोलन दिल्लीत करणार - On this occasion, Anna Hazare will hold the last agitation of his life in Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

प्रसंगी अण्णा हजारे आयुष्यातील शेवटचे आंदोलन दिल्लीत करणार

मुरलीधर कराळे
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत आंदोलन सुरू आहे. बारा दिवसांनंतरही केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढला नाही. आज भारत बंदची हाक दिली. नगरमधील शेतकरी संघटना सक्रीय आहेत.

नगर : शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारने केलेल्या कायद्याला विरोध दर्शवित शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. त्याला नगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यात आंदोलने झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित याप्रश्नी प्रसंगी आपण दिल्लीत आपल्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन करू, असा इशारा दिला.

हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिर परिसरातील महात्मा गांधी याच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीत करू, असा इशारा त्यांनी दिला.

कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत आंदोलन सुरू आहे. बारा दिवसांनंतरही केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढला नाही. आज भारत बंदची हाक दिली. नगरमधील शेतकरी संघटना सक्रीय आहेत. पुणतांबे येथून यापूर्वी अनेक शेतकरी आंदोलनांचा प्रारंभ झाला आहे. आज पुणतांब्यातही या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

पारनेर तालुक्यातही बंद पाळण्यात आला. राळेगणसिद्धी येथे हजारे यांनी लाक्षणिक उपोषण केले. सकाळी ग्रामदैवत संत यादवबाबा, पद्मावती देवीचे दर्शन घेऊन त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण केले.

अकोले तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. 

केंद्र सरकारने आश्वासन पाळले नाही

हजारे म्हणाले, ""केंद्र सरकारने यापूर्वी मला दोन वेळा दिलेले लेखी आश्वासन पाळले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत, ही आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीत करील. कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता दिली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतमालास उत्पादनखर्चापेक्षा 50 टक्के जादा हमीभाव द्यावा.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख