नगरची रुग्णसंख्या घटतेय ! नव्याने आढळले 405 रुग्ण - The number of patients in the city is decreasing! Newly found 405 patients | Politics Marathi News - Sarkarnama

नगरची रुग्णसंख्या घटतेय ! नव्याने आढळले 405 रुग्ण

मुरलीधर कराळे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

मागील महिन्यात एकाच दिवसात 1 हजार 300 वर रुग्ण आढळले होते. गेल्या चार-पाच दिवसांत रुग्णसंख्या कमी आढळून येत आहे.

नगर : जिल्ह्यात नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले असून, काल दिवसभरात 405 रुग्ण आढळून आले. मागील महिन्यात एकाच दिवसात 1 हजार 300 वर रुग्ण आढळले होते. गेल्या चार-पाच दिवसांत रुग्णसंख्या कमी आढळून येत आहे.

सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39 हजार 562 झाली असून, 4 हजार 142 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 724 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 44 हजार 428 झाली आहे.

जिल्ह्यात काल ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये महापालिका शेत्रतील ५, खासगी प्रयोग शाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७१, अकोले ३, जामखेड २, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर ११, पाथर्डी ३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ४, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल १९३ जण बाधित आढळून आले. यामध्ये, कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासे २४, पाथर्डी २४, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख