नगरमध्ये नव्याने कोरोना रुग्णवाढीपेक्षा डिस्चार्जची संख्या जास्त - The number of discharges is higher than the number of new corona outbreaks in the city | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगरमध्ये नव्याने कोरोना रुग्णवाढीपेक्षा डिस्चार्जची संख्या जास्त

मुरलीधर कराळे
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीत घट होत असल्याने काहीसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे.

नगर : जिल्ह्यात काल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले असून, नव्याने 600 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीत घट होत असल्याने काहीसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. 

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३३४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४,
अकोले १४, जामखेड १, कर्जत २, नगर ग्रामीण ११, नेवासा ४, पारनेर ३, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३१, अकोले ३, जामखेड ३, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ९, नेवासा ४, पारनेर ४, पाथर्डी ५, राहाता १२, राहुरी ९, संगमनेर ४, शेवगाव ६, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले ४५, जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासा ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव १४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३० आणि कॅन्टोन्मेंट ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 694 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 42 हजार 559 वर गेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख