नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांवर - The number of corona patients in Nagar district is over 40,000 | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांवर

मुरलीधर कराळे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात एकूण 40 हजार 650 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 हजार 644 झाली असून, सध्या 4 हजार 341 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आज नव्याने 790 रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकूण 40 हजार 650 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 हजार 644 झाली असून, सध्या 4 हजार 341 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. आज नव्याने ७९० ने वाढ झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२३ आणि अँटीजेन चाचणीत ४१९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ३, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ९, श्रीरामपूर २,  नेवासे १२, अकोले १७, राहुरी १, शेवगाव ३, कोपरगाव ६, कर्जत ५, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७७, संगमनेर १६, राहाता १५, पाथर्डी १, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर १८, नेवासा १५, श्रीगोंदा ३, पारनेर १८, अकोले २, राहुरी १९, शेवगाव २, कोपरगाव १, जामखेड ६ आणि कर्जत ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १७, संगमनेर ७९, राहाता २७, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट ६, नेवासा ६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, अकोले ४१, राहुरी १८, शेवगाव १२, कोपरगाव २८, जामखेड ३० आणि कर्जत ३९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख