कोरोना रुग्णांची संख्या घटतेय ! जिल्ह्यात दीड हजार रुग्णांवर उपचार सुरू - The number of corona patients is declining! One and a half thousand patients are undergoing treatment in the district | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोना रुग्णांची संख्या घटतेय ! जिल्ह्यात दीड हजार रुग्णांवर उपचार सुरू

मुरलीधर कराळे
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोना रुग्णांच्या तपासणीबाबत नागरिकांमधून संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाची तपासणी केल्यानंतर काहींचे अहवाल आठ दिवस होऊनही मिळत नाहीत.

नगर : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांत घट होताना दिसत आहे. महिन्यापूर्वी जिल्ह्यात साडेचार हजार रुग्णांवर उपचार सुरू होते. ती संख्या आता दीड हजारांच्या आत आली आहे. तसेच रोज नव्या रुग्णांची संख्याही 300 च्या आत आल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार २९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के झाले आहे. आज नव्याने 285 रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्हाभरातील रुग्णालयांत उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४९१ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्य़ंत 853 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 55 हजार 635 रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. 

आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८४ आणि अँटीजेन चाचणीत १४९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, जामखेड २, नगर ग्रामीण ७, नेवासा ३, पारनेर २, पाथर्डी २, राहाता १, राहुरी ५, संगमनेर १, शेवगाव १, श्रीगोंदे २, कॅंटोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९,अकोले २, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण ४, नेवासे १, पारनेर ४, पाथर्डी ४, राहाता १०, राहुरी ९, संगमनेर ७, शेवगाव ३, श्रीगोंदे ७, श्रीरामपूर ९, कॅंटोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा २२, अकोले १४, जामखेड ५, कर्जत १४, कोपरगाव ५,  नगर ग्रामीण ३, नेवासे १, पारनेर ८, पाथर्डी ३०, राहाता १२, राहुरी ३, संगमनेर १६, शेवगाव ६, श्रीगोंदे ७, श्रीरामपूर २ आणि कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णांच्या संख्येबाबत संभ्रम

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीबाबत नागरिकांमधून संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाची तपासणी केल्यानंतर काहींचे अहवाल आठ दिवस होऊनही मिळत नाहीत. त्यामुळे रोज दिला जाणारी रुग्णसंख्या बरोबर आहे, की त्यामध्ये काही गडबड आहे, याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे सरकारकडून जाहीर केले जात असले, तरी प्रत्यक्षात रुग्ण जास्त असल्याचे अनेकांचे मत आहे. बहुुतेक नागरिक कोरोना तपासणी करण्यापेक्षा थेट उपचार घेत असल्यानेही रुग्णसंख्या कमी दिसत असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख