कोरोना रुग्णांची संख्या घटतेय ! बरे होण्याची टक्केवारी 90 वर - The number of corona patients is declining! Healing percentage at 90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कोरोना रुग्णांची संख्या घटतेय ! बरे होण्याची टक्केवारी 90 वर

मुरलीधर कराळे
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, आज नव्याने केवळ 481 रुग्ण आढळून आले.

नगर : नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, आज नव्याने केवळ 481 रुग्ण आढळून आले. गेल्या महिनाभराच्या तुलनेत ही आकडेवारी निम्याने कमी आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 90 गेली आहे. 

नगर : जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के झाले आहे. आज नव्याने रूग्ण संख्येत ४८१ ने वाढ झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७७ आणि अँटीजेन चाचणीत ३६२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२,
अकोले १, जामखेड ४, नगर ग्रामीण ३, नेवासे १, पारनेर १, राहाता १, श्रीगोंदे १, मिलिटरी हॉस्पिटल ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३०, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ४, नेवासे २, पारनेर १, पाथर्डी ३, राहाता २, राहुरी ९, संगमनेर १९, शेवगाव ३, श्रीरामपूर १,अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३६२ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा १६, अकोले ४४, जामखेड ३०, कर्जत १७, कोपरगाव १८, नेवासा २७, पारनेर १२, पाथर्डी ३९, राहाता ४९, राहुरी १५, संगमनेर २९, शेवगाव २७, श्रीगोंदा १७,, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 41 हजार 75 झाली असून, सध्या 3 हजार 699 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 732 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याची कोरोनाचे रुग्ण 45 हजार 506 झाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख