कोरोनाची संख्या 35 हजारांवर, दिवसभरात आढळले 922 नवीन रुग्ण - The number of corona over 35 thousand, 922 new patients found during the day | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाची संख्या 35 हजारांवर, दिवसभरात आढळले 922 नवीन रुग्ण

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 922 रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या 34 हजार 715 झाली असून, आतापर्यंत २९ हजार ८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी गेले आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 922 रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या 34 हजार 715 झाली असून, आतापर्यंत २९ हजार ८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी गेले आहेत.

जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालका १८५, संगमनेर ३, राहाता १, पाथर्डी २, श्रीरामपूर १४, नेवासा २३, श्रीगोंदा ४, पारनेर ६, अकोले १५, राहुरी ८,  कोपरगाव ७, जामखेड २, मिलिटरी हॉस्पिटल २१, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११३, संगमनेर ८, राहाता ५०, पाथर्डी ४, नगर ग्रामीण १७, श्रीरामपुर ४८, नेवासा १०, श्रीगोंदे ८, पारनेर १४, अकोले ९, राहुरी २३, शेवगाव १, कोपरगाव १६, जामखेड २ आणि कर्जत ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल २९९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १९, संगमनेर २१, राहाता २०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ४, श्रीगोंदा २२, पारनेर १०, अकोले १६, राहुरी ४१, शेवगाव ३८, कोपरगाव १३, जामखेड २६ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख