Now wash the city! Found 12 patients today, Artillery, Siddharthnagar Contentment Zone | Sarkarnama

आता नगरची धुलाई ! आज आढळले 12 रुग्ण, तोफखाना, सिद्धार्थनगर कन्टेंटमेंट झोन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 जून 2020

शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसर कन्टेंटमेंट म्हणून जाहीर झाला असून, तो परिसर आज सील केला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे 12 नवीन रुग्ण आढळले असून, कोरोनाची संख्या 334 वर पोहोचली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील नालेगाव परिसरातील वाघगल्लीत 4, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये प्रत्येकी दोन, पारनेर, सुपे, चंदनापूर (ता. राहाता), दरेडावी(ता. नगर) येथील  प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसर कन्टेंटमेंट म्हणून जाहीर झाला असून, तो परिसर आज सील केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरात कोरोनाचा कहर झाला आहे. काल तोफखाना परिसरात सात रुग्ण सापडले. तसेच सिद्धार्थनगरमध्येही चार रुग्ण सापडल्याने हे दोन्ही परिसर आज सील करण्यात आले. नालेगावातील वाघ गल्लीत यापूर्वीही दोन रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी आज चार जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हा परिसरही सील करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. याबरोबर लेंडकर मळा, दिल्लीगेट आदी परिसरातही रुग्ण वाढू लागल्याने हाही परिसर सील करण्याची शक्यता आहे. 

ठाणे येथील पारनेर येथे आलेला पुरुष कोरोनाबाधित आढळला असून, तो मुंबईतील पोलिस दलात कार्यरत आहे. खडकवाडी येथील पोलिसासह ते ठाण्याहून नगरला आले होते. ते कोरोनाबाधित आढळले. तसेच सुपे येथील 56 वर्षाची महिला कोरोनाबाधित आढळली. चंदनापूर (ता. राहाता) येथील 24 वर्षाचया युवकाला लागण झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगमनेर शहर मात्र कोरोनापासून दूरावत नाही. आजही मोमीनपुरा येथील 46 वर्षाच्या पुरुष, नाईकवाडापुरा येथील एका भागातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील महिलेचे अहवाल आज पाॅझिटिव्ह आले. 

दरम्यान, आज रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुथ हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामध्ये संगमनेरचे चार, अकले व मुंबई येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ही परिसर झाला हाॅटस्पाॅट

तोफखाना परिसरातील सिद्धीबाग, तोफखाना, शितळादेवी मंदिर, बागडे ज्वेलर्स, चितळेरोड, नेहरू मार्केट, चाैपाटी गारंजा, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा. सिद्धार्थनगर परिसरातील जाधव मळा, कवडे नगर,सारडा काॅलेज, सारडा काॅलेजची मागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू हा परिसर हाॅटस्पाॅट जाहीर झाला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख