"धनगर समाजासाठीच्या 13 योजनांमधील एकही पैसा मिळाला नाही' - "None of the 13 schemes for Dhangar Samaj got money" | Politics Marathi News - Sarkarnama

"धनगर समाजासाठीच्या 13 योजनांमधील एकही पैसा मिळाला नाही'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

एक रुपयाही प्रत्यक्षात दिला नसल्याचे वास्तव आज प्रश्नोत्तरात धनगर समाजासाठीच्या कल्याणकारी योजनांसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा सुरू असताना समोर आले.

मुंबई : 2019 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तत्कालीन सरकारने धनगर समाजासाठी विविध विकासाच्या 13 योजनांची घोषणा करून एक हजार कोटी रुपये देण्याचे घोषित केले. मात्र, त्यातील एक रुपयाही प्रत्यक्षात दिला नसल्याचे वास्तव आज प्रश्नोत्तरात धनगर समाजासाठीच्या कल्याणकारी योजनांसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा सुरू असताना समोर आले.

हेही वाचा.. घुलेंच्या शर्य़तीत शेळकेंची एन्ट्री

दरम्यान, 2020-21 या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेला कोटी रुपये कोविडचे निर्बंध असताना देखील काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला असून, येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेसह महाविकास आघाडीचे सरकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या 13 विकास योजनांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना केले.

मागील सरकारच्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' या संस्थेने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यास तत्कालीन सरकारने उशीर केला, तसेच; हे त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आमदार महोदयांनी सुद्धा सभागृहात मान्य केले.

अंगणवाडी सेविका पुरस्कारांच्या वितरणाला कोरोनाची आडकाठी 

नगर : महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे दर वर्षी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुरस्कार वितरणाबाबत जिल्हा परिषदेची कुठलीच हालचाल नाही. 

हेही वाचा... घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री

जिल्हा परिषदेतर्फे दर वर्षी महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका, अशा एकूण 84 महिला कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या वर्षीचे पुरस्कार पुढच्या वर्षी वितरित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, पुरस्कार वितरणाचा निधीही इतरत्र वळविण्यात आला आहे. पुढील वर्षी दोन वर्षांचे पुरस्कार वितरण होणार असल्याने कार्यक्रमासाठी दहा लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केलेली आहे. हा प्रस्ताव सभागृहासमोर मांडण्यात येणार आहे. 

हेही वाचा.. कुकडीचा कालवा फोडला 

कोरोना संकटात अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांनी व पर्यवेक्षिकांनी उत्कृष्ट काम केले आहे. प्रशासनाने या सर्वांच्या कामाचे महिलादिनी कौतुक करण्यासाठी, स्थानिक पातळीवर शासनाच्या नियमांचे पालन करून छोटेखानी सत्कार करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महिलादिनी महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभ स्थगित करण्यात आला आहे. पुढील वर्षी दोन वर्षांच्या पुरस्कारांचे एकत्र वितरण करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण समितीचे सभापती मीरा शेटे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख