लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको - No need for negligence as lockdown restrictions have been relaxed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जून 2021

संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोना मुक्त झाली असून, 31 गावांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

संगमनेर : कोणत्याही रुपाने मानवी शरिरात प्रवेश करणाऱ्या कोरोनाच्या (Corona) अदृष्य शत्रूच्या विरोधात मानवजातीचे युध्द सुरु आहे. दोन महिन्यांनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाले असले, तरी कोणीही निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. (No need for negligence as lockdown restrictions have been relaxed)

संगमनेरातील अमृतवाहिनी अभियांत्रीकी महाविद्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यातील रुग्णवाढ कमी होते आहे, ही समाधानाची बाब असली तरी, निर्बंधाच्या शिथीलतेनंतर वाढलेली गर्दी चिंताजनक आहे. वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते तीसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने शासकिय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोना मुक्त झाली असून, 31 गावांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कोवीडची लक्षणे असणार्‍यांचे विलगीकरण, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे कोरोना प्रादुर्भावातून मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, विविध कारणास्तव वाढणारी गर्दी पाहता, आगामी संकटाला आपण जबाबदार असू. कोरोना संसर्गजन्य असल्याने सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर अनिवार्य आहे.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सुनंदा जोर्वेकर, मिरा शेटे, नवनाथ आरगडे, शैलेश कलंत्री, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, सीताराम राऊत, निखिल पापडेजा, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचेरिया, डॉ.राजकुमार जऱ्हाड, डॉ. सुरेश घोलप,पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
 

थोरातांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे प्रगतीपथावर

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तळेगाव पट्ट्यातील निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पळसखेडे व पिंपळे या पाच गावांसाठी भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे होणाऱ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच या गावांना पूर्ण दाबाने मुबलक पाणी मिळणार आहे.

भोजापूर धरण कार्यक्षेत्रावर सुरु असलेल्या कामाची पहाणी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली. या वेळी त्यांच्यासमवेत अभियंता बी. आर. चकोर उपस्थित होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्याच्या तळेगाव पट्ट्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पळसखेडे, पिंपळे या पाच गावांसाठी भोजापूर धरणातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे 15 किलोमीटर लांबीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. कोरोना काळात नगर व नाशिकमधील वन विभागाच्या विविध परवानग्या व इतर तांत्रिक मंजुरी पूर्ण करीत हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या योजनेमुळे संगमनेर शहराप्रमाणेच निमोणसह पाच गावांना ग्रॅव्हिटी द्वारे मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीज बिल व इतर मेंटेनेस खर्च कमी होणार आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करीत, ही गावे टँकरमुक्त करणे हे मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, यातून लवकरच पाणी पुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

हेही वाचा..

कोरोनाचे असेही क्रोर्य़

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख