भाजपच्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी नितीन दिनकर - Nitin Dinkar as BJP's state panelist member | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी नितीन दिनकर

सुनिल गर्जे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच राज्यात दहा प्रवक्ते व 33 जणांची निवड महत्वाच्या चर्चा करण्यासाठी पॅनलिस्ट सदस्यांची नियुक्ती केली आहे.

नेवासे : प्रदेश भाजपने नुकतेच पक्षाचे प्रवक्ते व राज्य पॅनलिस्ट सदस्यांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात नेवासे भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांची पक्ष संघटनेत अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिनकर यांना दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच राज्यात दहा प्रवक्ते व 33 जणांची निवड महत्वाच्या चर्चा करण्यासाठी पॅनलिस्ट सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात जिल्ह्यातून फक्त दिनकर यांची वर्णी लागली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे सर्वसामान्य कुटुंबातील नितीन दिनकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हा चिटणीस, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे बुथ प्रमुख, सध्या भाजपचे नेवासे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे दिनकर यांना आता पक्षाने थेट राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी निवड करून राज्यस्तरावर पक्षाचे करण्याची संधी दिली आहे. 

जबाबदारी सक्षमपणे पार पाडली : नितीन दिनकर 

"माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्येकर्त्यावर भाजप श्रेष्ठीने वेळोवेळी विश्वास टाकून मला पक्षाचे काम करण्याची संधी दिली. आता पक्षाने राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी माझी नियुक्ती केली. ती मी पद म्हणून नाहीतर एक पक्षाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष व सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पार पाडली. असे 
 नवनियुक्त राज्य पॅनलिस्ट सदस्य व नेवासे तालुका भाजपचे अध्यक्ष नितीन दिनकर म्हणाले. 

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख