Nine new patients in Nagar district, Corona Hatena in Maliwada | Sarkarnama

नगर जिल्ह्यात नऊ नवीन रुग्ण, माळीवाड्यातील कोरोना हटेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 जून 2020

नगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले.

नगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात रोज वाढ होत आहे. आज नऊ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील माळीवाडा भाग यापूर्वीच सील केला असून, आता कोठी परिसरातही रुग्ण सापडू लागल्याने निम्मे शहर कोरोनामुळे प्रतिबंधित झाले आहे.

आज जिल्ह्यात नवीन नऊ रुग्ण सापडले. नगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले. पाथर्डीतील चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण आहे. राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे.  

संगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगाव येथे एकजण चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आला असून, तो बोधिता निघाला. कळवा ( ठाणे) येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित निघाली आहे.

बाजारपेठा सुरू झाल्याने प्रश्न गंभीरजिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील बाजारपेठा सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना कोरोनाने वेढा दिला आहे. नगर शहरात यापूर्वी कमी रुग्ण होते, तथापि, मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाच दिवशी 18 रुग्ण आढळले होते. आज दुपारपर्यंतच नऊ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आज सायंकाळीही अहवाल प्राप्त होणार असून, त्यामध्ये किती रुग्ण आढळू शकतात, अशी स्थिती आहे.

मागील महिलाभर विवाह समारंभाच्या तारखा असल्याने अनेक विवाह झाले. त्यासाठी सुवर्णपेढी, कापडबाजारातील दुकानदारांनी आपापल्या पद्धतीने विक्री केली. हे करीत असताना सामाजिक अंतर पाळण्याचे बंधण असताना ते अनेकांना पाळता आले नाही. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये पाच पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दाखवून या नियमांना हरताळ फासला. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख