जामखेडला नवे पोलिस निरीक्षक ! हजर होताचा धाडसत्र सुरू - New police inspector for Jamkhed! Attendance begins | Politics Marathi News - Sarkarnama

जामखेडला नवे पोलिस निरीक्षक ! हजर होताचा धाडसत्र सुरू

वसंत सानप
शनिवार, 19 डिसेंबर 2020

गुन्हेगारी प्रव्रत्ती, अवैद्य धंदे सावकारकी, विनापरवाना शस्र बाळगणाऱ्यांचा बिमोड करण्याचा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचा संकल्प गायकवाड यांनी बांदला आहे.

जामखेड : जामखेडला आठवडाभरापूर्वी नियमित पोलिस निरीक्षक म्हणून संभाजी गायकवाड हजर झाले. हजर झाले, त्याच रात्री चोरट्यांनी चोरी करून त्यांना अप्रत्यक्ष सलामीच दिली. गायकवाड यांनीही त्या चोरांना तातडीने मुद्देमालासह गजाआड केले. ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिसांना गुंगारा देऊन फरार आसलेल्या सात वेगवेगळ्या गुन्ह्यातील सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांची ही कामाची दबंगगिरी जामखेडकरांना चांगलीच भावली.

जामखेडला नव्याने  पोलिस निरीक्षक म्हणून हजर झाल्यानंतर अशी धडाकेबाज कार्यवाही करणारे ते पहिलेच पोलीस निरीक्षक ठरले आहेत. याबाबत गायकवाड म्हणाले, "गुन्हेगारांचा व गुन्हेगारी प्रव्रत्तीचा बीमोड करण्यासाठी आपण काम करू. जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी नंदकिशोर खरात व दादासाहेब खरात (दोन्ही रा. हळगाव), बळीराम गणपत वाघमारे (रा. देवदैठण), एक महिला (रा. वाकी), महालिंग मोहीते (रा. पिंपळगाव आळवा), त्रिंबक गोपाळघरे,( रा. मोहरी), मनोज बबन हळनोर (रा. मोहरी, ता. जामखेड) अशा एकूण गंभीर गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.``

गुन्हेगारी प्रव्रत्ती, अवैद्य धंदे सावकारकी, विनापरवाना शस्र बाळगणाऱ्यांचा बिमोड करण्याचा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचा संकल्प गायकवाड यांनी बांदला आहे. त्यांना साथ देण्यासाठी दोन पोलिस उपनिरीक्षक व एक सहाय्यक निरिक्षक रुजू झाले आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. पोलिसाचे मनोबल उंचावणार, गुन्हेगारांना खाकीचा धाक राहील, बनावट दारु, वाळू माफीयांच्याही मुसक्या आवळणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

आमदार रोहित पवारांनी केली सार्थ निवड

जामखेडला पंधरा दिवस नियमित पोलिस निरीक्षकपद नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षकांडे अतिरिक्त पदभार होता. त्यावेळी जामखेडकरांनी नियमित पोलिस निरीक्षकाची मागणी आमदार पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी योग्य अधिकारी देऊ, अशी ग्वाही दिली होती. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हजर.होताच त्यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाहीमुळे आमदार रोहित पवारांची निवड सार्थ ठरली, अशी प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख