नगरमध्ये नवे 35 रुग्ण, एकाच दुकानात 9 कामगारांना बाधा, आता ग्राहकांचा शोध सुरू

जिल्ह्याचा आतापर्यंत कोरोनाचा आकडा 500 वर गेला आहे. नगर शहरातील सर्वात मोठे असलेल्या कोहिनूर या वस्त्रदानातील 9 कामगारांना बाधा झाल्याने आता ग्राहकांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.
3Corona_20Sakal_20times_2.jpg
3Corona_20Sakal_20times_2.jpg

नगर : नगरमध्ये आज नव्याने 35 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा आतापर्यंत कोरोनाचा आकडा 500 वर गेला आहे. नगर शहरातील सर्वात मोठे असलेल्या कोहिनूर या वस्त्रदानातील 9 कामगारांना बाधा झाल्याने आता ग्राहकांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्यांपैकी एक 90 वर्षे वयाची वृद्ध व्यक्ती आहे. 

नगर शहरातील तोफखाना, नालेगाव, ढवणवस्ती, केडगाव आदी परिसरात रोज रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. नगर शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या दिल्लीगेट, तोफखाना, नालेगाव आदी परिसर गेल्या आठ दिवसांपासून हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच बाजुचा सर्वच परिसर बफरझोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात दहा रुग्ण आढळले होते. सिद्धार्थनगर येथील 30 वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील 50 वर्षीय महिला आणि पदमानगर येथील 57 वर्षीय महिला, तसेच इतर दोघांचा समावेश आहे. यापूर्वीच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे हे रुग्ण वाढत आहेत. त्याचप्रमाणे ब्राम्हणवाडा (ता. अकोले) येथील युवक व 17 वर्षीय युवती बाधित आढळले आहेत. दोघेही मुंबईहून प्रवास करून आले होते. संगमनेर तालुक्यातील कुरण येथील 35 वर्षीय युवक बाधित आढळला असून, हा रुग्ण यापूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कात आला होता.

दुपारी आलेल्या अहवालात शहरातील 14, राहुरी तालुक्यातील 4, बीड जिल्ह्यातील 1, पाथर्डी तालुक्यातील 1, कोपरगावमधील 3, राहाता तालुक्यातील 1 आणि श्रीरामपूर येथील 1 रुग्ण आढळून आला आहे. नगर शहरातील तोफखाना भागातील 10, केडगाव येथील 1, भूषणनगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. पाथर्डीतील वामनभाऊनगर येथील एक बाधित, कोपरगावमधील श्रीकृष्णनगर येथील 1, शिर्डीतील 1, श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव येथील एक असे रुग्ण आढळून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com