नगरमध्ये 381 नवीन रुग्ण, 465 जणांना डिस्चार्ज - new patients in the town, 465 discharged | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये 381 नवीन रुग्ण, 465 जणांना डिस्चार्ज

मुरलीधर कराळे
रविवार, 26 जुलै 2020

जिल्ह्यात आज दिवसभरात 381 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच 465 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३४४९ झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात 381 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच 465 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३४४९ झाली आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ५, खासगी प्रयोगशाळेत 267 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५३ इतकी झाली आहे. आज ४६५ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळपर्यंत ६४ जण बाधित आढळून आले होते. त्यात नगर शहरातील 2, संगमनेर 36, कर्जत 10, राहाता 12, राहुरी 4 अशा रुग्णांचा समावेश होता. सायंकाळी त्यात आणखी ४५ रुग्णांची भर पडली. यामध्ये कर्जत 4, नगर शहरातील 2, राहाता 5, श्रीगोंदे 3, श्रीरामपूर 5, संगमनेर 15, अकोले 2, तर नेवासे तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले होते. अँटीजेन चाचणीत आज श्रीरामपूर येथील ५ जण बाधित आढळले. 

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६७ रुग्ण बाधित आढळले. यामध्ये नगर शहरातील २२४, कर्जत ३, नगर ग्रामीण ११, नेवासा १, पारनेर ६, पाथर्डी १, राहाता ६, राहुरी ५, शेवगाव १, श्रीगोंदा ३ आणि श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 1453 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूंची संख्या 51 आहे. 

नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय मंडळी आपापल्या परीने योगदान देत आहेत. संगमनेरमध्ये मात्र रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनापुढे उपाययोजनांचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक उपाययोजना करूनही तेथील रुग्ण हटत नाहीत. उलट त्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. चाचण्यांची संख्या वाढविली असली, तरी रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख