जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी पदभार घेताच शेतकऱ्यांना दिला असा दिलासा - The new Collector Dr. Bhosale gave relief to the farmers as soon as he took office | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी पदभार घेताच शेतकऱ्यांना दिला असा दिलासा

मुरलीधर कराळे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

यापूर्वी जिल्हयात काम केले असल्याने त्याचा अनुभव पाठिशी आहे. त्याचा फायदा नक्कीतच जनतेला करून देऊ. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

नगर : नूतन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी आज पदभार घेतला. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या स्थानिक स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होतील. नुकसानग्रस्तांचे पंचनामे अचूक होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असा दिलासा पहिल्याच दिवशी त्यांनी दिला. 

आज मावळते जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडून डाॅ. भोसले यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. या  वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला. ते म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग आदी पिकांचे नुकसान मोठे आहे. त्याचे पंचनामे नियमित होत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे संबंधित टिमला सूचना देऊन पंचनामे वेळेत होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नगरअंदाजे, पिकपाणी पेरा अहवालानुसार पंचनामे केले जातील. उद्याच्या पालकमंत्र्यांच्या दाैऱ्यात आपण त्यांच्यासोबत असू, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी जिल्हयात काम केले असल्याने त्याचा अनुभव पाठिशी आहे. त्याचा फायदा नक्कीतच जनतेला करून देऊ. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख