सत्यजीत तांबे यांच्या `श्रद्धा और सबुरी`ला नेटिझन्सने दिले खरमरीत उत्तर - Netizens gave a resounding answer to Satyajit Tambe's 'Shraddha and Saburi' | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

सत्यजीत तांबे यांच्या `श्रद्धा और सबुरी`ला नेटिझन्सने दिले खरमरीत उत्तर

मुरलीधर कराळे
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

विधानपरिषदेसाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेनेने आपापले उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांचेनाव येईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. तथापि, ते घेण्यात आले ऩाही. 

नगर : युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विटवर `श्रद्धा और सबुरी` असे ट्विट केले. त्यावर नेटिझन्सने त्यांचा चांगला समाचार घेतला आहे. विधान परिषदेसाठी तांबे यांचे नाव काॅंग्रेसच्या यादीत आले नाही. त्याचा संदर्भ देऊन एकाच घरात किती पदे द्यायचे, अशा शब्दांत नेटिझन्सने फटकारले आहे.

विधानपरिषदेसाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेनेने आपापले उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांचे नाव येईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. तथापि, ते घेण्यात आले ऩाही. सत्यजीत तांबे हे विधानपरिषदेतील आमदार डाॅ. सुधीर तांबे यांचे पूत्र, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तांबे यांच्या मातोश्री दुर्गा तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत.

सत्यजीत तांबे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काॅंग्रेसचे उमेदवार म्हणून नगर शहरातून उमेदवारी करण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी जोरदार तयारी केली होती. नंतर मात्र ते वातावरण शांत झाले. नगर शहरात तांबे यांचे कार्यालय असून, प्रारंभी रोज हजर असणारे तांबे आता महत्त्वाच्या कार्यक्रमासाठीच हजर असतात.

वडील विधानपरिषदेवर आमदार असताना त्यांना उमेदवारी कशी मिळेल, याबाबत राजकीय वर्तुळातून चर्चा होत होती. आज तांबे यांनी `श्रद्धा और सबुरी` असे म्हणून एक प्रकारे आपण थांबल्याचे सांगितले आहे. याचा नेटिझन्सने कडव्या शब्दांत समाचार घेतला आहे. 

प्रदीप पाटील यांनी तर काॅंग्रेसवर सडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ह्यामुळेच काॅंग्रेस मागे राहिली आहे. दादा राष्ट्रवादीवाले सांगतील त्यांनाच काॅंग्रेस घेते. हे परत एकदा सिद्ध झाले. राष्ट्रवादीला जिथे लोड, तिथे त्यांची ही शाळा नेहमीच असते. 

प्रसाद अंदे यांनी म्हटले आहे, की अहो तांबेसाहेब, तुमचे वडील आमदार, आई नगराध्यक्षा, मामा मंत्रीपदी विराजमान आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा युवक काॅंग्रेसचे अध्यक्षपद आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी तुम्ही नाराज झाले असते, तर समजले असते. या अशाच घराणेशाहीमुळे तुमचा पक्ष मागे चाललाय.

एकूणच अनेकांनी त्या ट्विटला वेगवेगळे उत्तरे दिले आहे. एकाच घरात जास्त पदे न देता इतर कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, असेच बहुतेकांचे म्हणणे आहे.

... तर सत्यजीत तांबे मुख्यमंत्री होतील

ट्विटरवर प्रितम यांनी म्हटले आहे, की दादा, तुम्ही जनतेचे नेते आहात. आणि दिमाखदार निवडणूक जिंकून आमदार आणि मंत्री आणि भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री नक्की व्हाल. कोशियारी नियुक्त आमदार होण्यात काय मजा नाही.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख