पाथर्डी तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींवर फडकला राष्ट्रवादीचा झेंडा : प्रताप ढाकणे - NCP's flag hoisted on 32 gram panchayats in Pathardi taluka | Politics Marathi News - Sarkarnama

पाथर्डी तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींवर फडकला राष्ट्रवादीचा झेंडा : प्रताप ढाकणे

राजेंद्र सावंत
मंगळवार, 19 जानेवारी 2021

बिनविरोध पार पडलेल्या खेर्डे व सोमठाणे खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचे पत्रक ढाकणे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे.

पाथर्डी : तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून, 36 गावात महाआघाडीला यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी केला आहे.

बिनविरोध पार पडलेल्या खेर्डे व सोमठाणे खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचे पत्रक ढाकणे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे.

आडगाव, माळीबाबुळगाव, भिलवडे, भोसे, चितळवाडी, चिचंपुर इजदे, ढाकणवाडी, घाटशिरस, घुमटवाडी, जाटदेवळे, मुंगुसवाडे, मोहोज बु, मोहोज खुर्द, मोहटे, मालेवाडी, नांदुर निंबादैत्य, निपाणी जळगाव, पारेवाडी, पिपंळगवाटप्पा, पिरेवाडी, राघोहिवरे, रांजणी, शिराळ, शेकटे, तोंडोळी, व वाळुंज ग्रामपंचायसप अन्य पंचायतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश मिळविले आहे.

गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी पक्षाला चांगले यश मिळाले असून, महाआघाडी सरकारने शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय जनतेला भावले आहेत. त्यांनी महाआघाडीला कौल दिला आहे. ढाकणे यांच्या पाथर्डी कार्यालयातून याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. 

तालुक्यातील जनतेने राज्य सरकारच्या कामगिरीवर खुश होवून पक्षाच्या बाजुने उभे राहुन महाआघाडीला मजबूत करण्यावर भर दिला आहे. तालुक्यातील प्रश्न सरकारच्या माध्यमातुन सोडविण्यासाठी प्रयत्न करु. शिवसेना व काँग्रेस पक्षानेही आमच्या सोबत चांगली कामगिरी केली आहे, असे मत अॅड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा..

पंचवीस वर्षानंतर चिलवडी ग्रामपंचायतीवर डॉ. जगताप गटाचा झेंडा 

राशीन : चिलवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 11 जागांपैकी डॉ. विनायक जगताप यांच्या नेतृत्वाखालील सिध्दीविनायक ग्रामविकास पॅनेलने 6 जागांवर विजय मिळवित चिलवडी ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडे खेचून आणली.

माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखालील जयशिवशंकर पॅनेलला पाच जागांवरच विजय मिळाल्याने त्यांना विरोधात बसण्याची वेळ आली. 
सिध्दीविनायक पॅनेलचे विजयी उमेदवार : गौरी माऊली शिंदे, कौशल्या सोमनाथ होले, अशोक विठ्ठल लोंढे, संजय मारूती खैरे, राणी सचिन शिंदे.
जयशिवशंकर पॅनेलचे विजयी उमेदवार : रविंद्र जगन्नाथ नवले, अनिता पांडूरंग शिंदे, राजेंद्र सुदाम हिरभगत, राधिका संग्राम पाटील, लक्ष्मी मनोहर काळोखे. 

पंचवीस वर्षानंतर बहुमत मिळाल्याने निवडणूक निकालानंतर डॉ. जगताप यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. राशीन येथे येऊन जगदंबा देवीचे दर्शन घेत चिलवडीत विजयी उमेदवारांसह डॉ. जगताप यांनी आभार फेरी काढून ग्रामस्थांचे आभार मानले.

विशेष म्हणजे जुन्या परंपरा मोडीत काढून शासनाच्या नियमांचे पालन करीत आणि स्थानिक वादांना फाटा देत अत्यंत संयम आणि शिस्तीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख