"ज्ञानेश्वर'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नरेंद्र घुले - Narendra Ghule of NCP is the president of Dnyaneshwar | Politics Marathi News - Sarkarnama

"ज्ञानेश्वर'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नरेंद्र घुले

सुनील गर्जे
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

ज्ञानेश्‍वर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली होती. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली.

कुकाणे : भेंडे (ता. नेवासे) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते माजी आमदार नरेंद्र घुले यांची, तर उपाध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा ज्ञानेश्वर उद्योगसमूहातर्फे सत्कार करण्यात आला. 

ज्ञानेश्‍वर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली होती. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. त्यात घुले व अभंग यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आहेर यांनी केली. मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले, विठ्ठल लंघे, बबन भुसारी, प्रा. नारायण म्हस्के, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, या निवडीकडे महाराष्ट्रातील सहकाराचे लक्ष लागले होते.

 

हेही वाचा..

साखर कारखानदारीला बदल स्वीकारावे लागतील ः देशमुख 

कुकाणे : "ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला सहकारी साखर कारखानदारीने चालना मिळाली. संलग्न शिक्षण संस्था उभ्या राहिल्याने शेतकऱ्यांची मुले शिक्षित झाली. खासगीकरणाला सामोरे जाताना सहकारी साखर कारखानदारीला नवे बदल स्वीकारावे लागतील,'' असे प्रतिपादन प्राचार्य भगवान देशमुख यांनी केले. 

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कुकाणे ग्रामस्थांच्या वतीने कुकाणे (ता. नेवासे) येथील डॉ. यशवंत गवळी यांचा युवा नेते अमोल अभंग व प्राचार्य देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. 

युवा नेते अमोल अभंग म्हणाले, की मानवी मूल्यांना प्राधान्य देत संस्था सक्षम करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या वेळी डॉ. अरुण वाबळे, डॉ. सुभाष भागवत यांचीही भाषणे झाली. शिवसेनेचे राजेंद्र बागडे यांनी प्रास्ताविक, प्रा. एन. के. देशमुख यांनी स्वागत केले. 

डॉ. देशमुख, डॉ. नीलेश लुणिया, डॉ. किरण गवळी, डॉ. कारभारी नरवडे, डॉ. गणेश आर्ले, डॉ. किशोर लांडे, प्रा. पांडुरंग देशमुख, महेश देशमुख, रवींद्र नाईक, अंकुश गरड, दिलीप उदावंत आदी उपस्थित होते. अनिल गर्जे यांनी आभार मानले. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख