'मुळा' च्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर, उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले  - Nanasaheb Tuvar as the president of 'Mula' and Kadubal Kardile as the vice president | Politics Marathi News - Sarkarnama

'मुळा' च्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर, उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले 

विनायक दरंदले
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर, तर उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर, तर उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नानंतर १९ जानेवारी रोजी 'मुळा'ची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संचालक निलेश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी तुवर यांच्या नावाची सूचना केली. बाळासाहेब गोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष कर्डिले यांच्या नावाची सूचना बापुसाहेब शेटे, तर अनुमोदन तारा पंडित यांनी दिले.

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. या वेळी सर्व संचालक, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जलसंधारण मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील,.जिल्ह्यात सर्वप्रथम हाती घेतलेला ७५ कोटी रुपये खर्चाचा इथोनॅल प्रकल्प पूर्ण करण्याला अग्रक्रम राहील, असे अध्यक्ष तुवर यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

पाथर्डीत 107 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर 

पाथर्डी : तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यात अनुसूचित जातींसाठी 8, अनुसूचित जमातींसाठी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग 27, खुल्या प्रवर्गास 69 ठिकाणी संधी मिळाली आहे. 

आरक्षण असे : 
अनुसूचित जाती- तीनखडी, कोल्हार, भालगाव, हनुमान टाकळी. महिला- माळीबाभूळगाव, मोहरी, जवखेडे दुमाला, शिंगवे केशव. 
अनुसूचित जमाती महिला- अंबिकानगर. नागरिकांचा मागास प्रवर्ग- भारजवाडी, मिडसांगवी, जांभळी, ढाकणवाडी, पिंपळगाव टप्पा, शिराळ, धामणगाव, आल्हनवाडी, जवळवाडी, शिरापूर, करोडी, कौडगाव, वडगाव, आडगाव, हत्राळ, निवडुंगे. महिला- पिंपळगव्हाण, दैत्यनांदूर, डोंगरवाडी, धामणगाव, डांगेवाडी, मिरी, धनगरवाडी, पिरेवाडी, कोरडगाव, औरंगपूर, कळसपिंप्री, कोळसांगवी. 
सर्वसाधारण- आल्हनवाडी, कामत शिंगवे, गितेवाडी, राघोहिवरे, मांडवे, सोमठाणे खुर्द, सातवड, घाटशिरस, चितळी, पाडळी, पागोरी पिंपळगाव, कासार पिंपळगाव, आगसखांड, दुलेचांदगाव, रांजणी, पत्र्याचा तांडा, घुमटवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, तोंडोळी, खरवंडी कासार, अकोला, मालेवाडी, एकनाथवाडी, भिलवडे, चिंचपूर इजदे, मोहोज खुर्द, चिचोंडी, देवराई, खांडगाव, जवखेडे खालसा, मढी. 
महिला- डमाळवाडी, धारवाडी, पारेवाडी, वैजूबाभूळगाव, तिसगाव, लोहसर, दगडवाडी, भोसे, करंजी, सांगवी बुद्रुक, खेड, कारेगाव, शिरसाटवाडी, केळवंडी, माणिकदौंडी, जाटदेवळे, सुसरे, सोमठाणे नलावडे, सोनोशी, जिरेवाडी, शेकटे, मोहोज देवढे, मोहटे, चिंचपूर पांगूळ, कडगाव, टाकळीमानूर, वाळुंज, कोपरे, ढवळेवाडी, सैदापूर, बोरसेवाडी, निपाणी जळगाव, मुंगूसवाडे, जोगेवाडी, येळी. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख