नगर जिल्हा परिषद ! जगन्नाथ भोर यांच्याकडून ग्रामसेवकांचे काैतुक - Nagar Zilla Parishad! Kaituk of Gramsevaks from Jagannath Bhor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगर जिल्हा परिषद ! जगन्नाथ भोर यांच्याकडून ग्रामसेवकांचे काैतुक

मुरलीधर कराळे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

चांगल्या कामांना प्रसिद्धीची गरज पडत नाही. सुविधा दिल्यास दुवाही मिळते. चांगले काम करणार्‍यांना मदत केलीच पाहिजे, ती आम्ही करु.

नगर : ``कोरोनाच्या काळात ग्रामसेवक चांगले काम करीत आहेत. यापुढे अनेक सर्व्हेक्षण करायचे आहेत. त्यासाठी इतर विभागांची मदत मिळणार आहे. बदल्यांच्या बाबतीत सर्व समाधानी असून, अडचणीतून मार्ग काढू. कोणीही स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये,`` अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी ग्रामसेवकांचे काैतुक केले.

चांगल्या कारभाराबाबत आणि बिनविरोध निवडणूक पद्धतीमुळे राज्यात सहकारी क्षेत्रात नावाजलेल्या श्री छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेस भोर यांनी भेट दिली. त्यानिमित्त त्यांनी ग्रामसेवकांचे काैतुक केले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल या वेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुदाम बनसोडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर सुर्वे आदींनी त्यांचे स्वागत केले.

भोर म्हणाले, की चांगल्या सूचनांचे स्वागत आहे. चांगल्या कामांना प्रसिद्धीची गरज पडत नाही. सुविधा दिल्यास दुवाही मिळते. चांगले काम करणार्‍यांना मदत केलीच पाहिजे, ती आम्ही करु. कोरोना काळात ग्रामसेवकांनी दिलेले योगदान कौतुकास पात्र आहे. यापुढेही काम करताना सर्वांनी स्वत: बरोबर कुटूंबालाही जपावे. 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख