Nagar Panchayat's 'Kavachkundale' to Shirdi to fight Corona | Sarkarnama

कोरोनाशी लढण्यासाठी शिर्डीला नगरपंचायतीचे `कवचकुंडले`

मुरलीधर कराळे
बुधवार, 3 जून 2020

नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी त्यांच्यावतीने शहरात भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष विभागाने सूचविलेले होमिओपॅथीक `आरसानिक-30` या गोळ्या संपूर्ण शहरात मोफत वाटप करण्यात आल्या.

नगर : जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला कोरोनापासून वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी चोख व्यवस्थापन करून कोरोनाशी सामना करण्यासाठी शिर्डीला सुविधांचे `कवचकुंडले` केले आहेत. 

शिर्डीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगरपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शिर्डीत अग्निशामक गाड्या व ट्रॅक्टरच्या साह्याने सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच रोज धुरफवारणीही केली जात आहे. शहरात 17 पथक तयार करून पल्स आॅक्सिमीटर, थर्मल डिव्हाईसद्वारे प्रत्येक घरात तपासणी केली जात आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तपासणीदरम्यान जे लोक आजारी सापडतील, त्यांची वेळोवेळी तपासणी होऊन त्यांच्यावर पथकाची नेमणूक केली जात आहे. नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोज, सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. शहरात स्वच्छता रहावी, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शिर्डी शहराला थ्री-स्टार रेटिंग मिळाले आहे. 

40 हजार लोकांना गोळ्यांचे वाटप

नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी त्यांच्यावतीने शहरात भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष विभागाने सूचविलेले होमिओपॅथीक `आरसानिक-30` या गोळ्या संपूर्ण शहरात मोफत वाटप करण्यात आल्या. या गोळ्या डबीमध्ये भरताना विशेष काळजी घेतली होती. प्रत्यक्ष नगराध्या कोते, नितीन कोते, रविशंकर गोंदकर, सायली कोते,डाॅ. वृषाली गोंदकर यांनी गोळ्या स्वतः भरण्याचे काम केले. वाटप करतानाही सामाजिक अंतर ठेवत व विशेष काळजी घेण्यात आली.

शिर्डी नगरी कोरोनाशी लढण्यास सज्ज : अर्चना कोतेशिर्डी येथे आमदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करून कोरोनाशी लढण्यास शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. येथे जागतिक पातळीवरून लोक येत असल्याने आगामी काळातील पर्यटक, भाविकांच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी होमिओपॅथिक गोळ्या वाटप करण्यात आल्या असल्याचे नगराध्या अर्चना कोते यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख